क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 08:01 IST2025-12-07T07:57:19+5:302025-12-07T08:01:13+5:30

क्रेडिट कार्ड म्हणजे मनात इच्छा आली की, हवी असलेली कोणतीही वस्तू किंवा सेवा मिळवण्याचा परवानाच असतो; परंतु मनावर ताबा नसेल तर मात्र हेच क्रेडिट कार्ड कार्डधारकाची ‘पत’ धोक्यात आणते. खरं म्हणजे क्रेडिट कार्डचा जन्मच मुळी पत (क्रेडिट) जपण्यासाठी झाला आहे; पण नेमका हाच उद्देश बाजूला जाऊन क्रेडिटवर-उधारीवर मौजमजा करण्याची सवय वाढत जाते आणि क्रेडिट कार्डचा सावकारी फास गळ्याभोवती आवळला जातो.

In the throes of credit cards What happens if you withdraw cash on a credit card? | क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?

क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?

विनायक कुळकर्णी

आर्थिक समुपदेशक

क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार जरूर करावेत; पण अधिक सजग राहूनच. क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याआधी या कार्ड संबंधित चार घटकांचा अभ्यास नव्हे पण किमान माहिती मात्र जाणून घेणे कर्तव्य ठरते. पहिला घटक आहे व्याजमुक्त अवधीचा (Interest-free period). क्रेडिट कार्डवर आपण ज्यावेळी व्यवहार करतो तो खरं म्हणजे उधारीचा मामला असतो. जेवढ्या रकमेची खरेदी किंवा व्यवहार झालेला असतो तेवढी रक्कम व्याजमुक्त अवधीत द्यावयाची असते. हा व्याजमुक्त अवधी किमान सतरा दिवसांपासून ते कमाल ५५ दिवसांपर्यंत असू शकतो. या अवधीत जमा केलेल्या रकमेवर व्याज आकारले जात नाही. आपापल्या क्रेडिट कार्डनुसार या व्याजमुक्त अवधीचा लाभ उठवत कार्ड वापरले तर; पण इथेच माशी शिंकते आणि उधारीच्या कर्जाचा डोंगर उभा राहतो.

दुसरा घटक आहे कार्डवरील किमान देणे रकमेचा (Minimum Due Payment). जर कार्डवरील पूर्ण रक्कम भरता येत नसेल तर एकूण देणे रकमेच्या किमान पाच टक्के रक्कम भरणे आवश्यक असते. पाच हजार रुपये देणे असेल तर त्या पाच हजार रुपयांच्या पाच टक्के म्हणजेच २५०/- रुपये भरणे आवश्यक ठरते. काही कार्डांच्या बाबतीत किमान देणे रक्कम २५० रुपये आहे.

क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?

क्रेडिट कार्डवर रोख रक्कम उचलता येणारी सोय हा चौथा आणि सर्वांत घातक घटक आहे. क्रेडिट कार्डवर उपलब्ध क्रेडिट रकमेच्या काही मर्यादेपर्यंत (काही कार्ड्स ३० टक्के, तर काही कार्ड्स ४० टक्के मर्यादेत) रोख रक्कम उचलण्याची सुविधा देतात.

त्याशिवाय क्रेडिट कार्डवर रोख रक्कम उचलल्यामुळे कमीत कमी ३०० रुपये किंवा रकमेच्या दोन ते अडीच टक्के यापैकी जी रक्कम अधिक असेल ती शुल्क म्हणून त्वरित लागते. तुमचे क्रेडिट कार्ड घेताना तुम्हाला मिळालेल्या करार पत्रात अटी व शर्तींमध्ये सर्वांत अचूक माहिती असते.

तुमच्या क्रेडिट कार्डशी संलग्न ऑनलाइन खात्यात लॉग इन केल्यावर तुमचा क्रेडिट कार्डचा विशिष्ट व्याजदर ऑनलाइन कळू शकतो. ग्राहक सेवेशी संपर्क साधून कार्ड देणाऱ्या बँकेची ग्राहक सेवा तुम्हाला तुमचा सध्याचा व्याजदर देऊ शकते.

Web Title : क्रेडिट कार्ड से नकद निकासी: शुल्क और ब्याज दरें समझें।

Web Summary : क्रेडिट कार्ड का बुद्धिमानी से उपयोग करने के लिए ब्याज-मुक्त अवधि और न्यूनतम भुगतान को समझना महत्वपूर्ण है। नकद निकासी पर तत्काल शुल्क और उच्च ब्याज लगता है। कर्ज से बचने के लिए शुल्क और ब्याज दरों के बारे में सटीक जानकारी के लिए कार्ड समझौते की समीक्षा करें।

Web Title : Credit Card Cash Withdrawals: Understand Charges and Interest Rates.

Web Summary : Using credit cards wisely involves understanding interest-free periods and minimum payments. Withdrawing cash attracts immediate charges and high interest. Review card agreements for accurate details on fees and interest rates to avoid debt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.