Mumbai rave party: ड्रग्ज, सेक्स आणि मौजमस्तीच्या अंधाऱ्या रात्री

By विजय दर्डा | Published: October 11, 2021 05:56 AM2021-10-11T05:56:40+5:302021-10-11T05:57:34+5:30

drugs, sex and fun: cordelia cruiseमधल्या रेव्ह पार्टीवर (Mumbai rave party) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) छापा टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन (Aryan khan Drugs arrest) याला अटक केली, ही बातमी गेले काही दिवस चर्चेचा विषय झाली आहे. अमली पदार्थ, सेक्स आणि मौजमस्तीच्या अंधाऱ्या रात्रींचा व्यापक संदर्भ असलेली ही कहाणी आहे. हे पश्चिमेकडून आले. या नशेत तरुणाई बुडत चालली आहे.

Dark nights of drugs, sex and fun | Mumbai rave party: ड्रग्ज, सेक्स आणि मौजमस्तीच्या अंधाऱ्या रात्री

Mumbai rave party: ड्रग्ज, सेक्स आणि मौजमस्तीच्या अंधाऱ्या रात्री

googlenewsNext

-  विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
कॉर्डेलिया क्रूझमधल्या रेव्ह पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने छापा टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक केली, ही बातमी गेले काही दिवस चर्चेचा विषय झाली आहे. ((mumbai rave party) हे स्वाभाविक असले तरी वास्तवातील कहाणी केवळ एक रेव्ह पार्टी किंवा काही बड्या बापांच्या बेट्यांना अटक झाली ही नाही. अमली पदार्थ, सेक्स आणि मौजमस्तीच्या अंधाऱ्या रात्रींचा व्यापक संदर्भ असलेली ही कहाणी आहे. हे पश्चिमेकडून आले. या नशेत तरुणाई बुडत चालली आहे. अमली पदार्थ खरोखरच विनाशकारी आहेत. (Aryan khan Drugs arrest)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो तथा ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांना तर या पार्टीत कोण बड्या बापांचे बेटे सामील आहेत, हे ठाऊकही नव्हते. ‘फॅशन टीव्ही’चा संचालक काशिफ खानने एक रेव्ह पार्टी क्रूझवर आयोजित केलीय, इतकेच त्यांना कळले होते. तिथे काशिफ खान सापडला नाही पण आर्यन खान हाती लागला आणि हाहाकार माजला. अधिकाऱ्यांकडून या रेव्ह पार्ट्यांविषयी मला मिळालेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. त्यात गांजा, चरस, अफू, कोकेन या अमली पदार्थांबरोबर एमडीएमए नावाच्या एका अमली पदार्थाचाही वापर होतो. 

हा अमली पदार्थ कामोत्तेजक भावना उत्पन्न करतो ज्यामुळे पुढचे काही तास आणि एकापेक्षा अधिक व्यक्तींशी समागमाची शक्ती टिकून राहते.  हे सगळे ज्या मुलींबरोबर होते त्याही कोणा कुटुंबातल्याच मुली असतात. मौजमस्तीच्या नादात त्या स्वत:ला नशेच्या क्रूर पंजात सोपवतात. पण यासाठी फक्त या मुलांनाच दोषी मानायचे का? - माझ्या मते या मुलांचे आईवडील, कुटुंबीय यासाठी जास्त दोषी आहेत. आपला मुलगा, मुलगी काय करतात याकडे लक्ष देणे कुटुंबीयांचे कर्तव्य असते. झगमगाटाच्या दुनियेकडून मध्यमवर्गीय मुलींची शिकार केली जाते, तर श्रीमंतांची मुले केवळ मौजमस्तीसाठी या चक्रात सापडतात. पैसा आहे; याचा अर्थ मुले बिघडली तरी चालेल असा नव्हे! मोलमजुरी करून, भांडी घासून मुलांना शिकवणारे आईबापही असतात. त्यातून एक अब्दुल कलाम पुढे येतो. मुलांना रोजखर्चाला हजारो रुपये देणारे आणि इतके पैसे कशाला हवेत? हेही न विचारणारे आईबापही असतात. रात्री उशिरा घरी आले तरी कुठे होतात, असे ते मुलांना विचारत नाहीत. या बेपर्वाईचा परिणाम दुसरा काय होणार?  

खिसे गरम  असलेल्या मुला-मुलींना आपल्या सापळ्यात ओढण्यासाठी कोपऱ्या कोपऱ्यावर अमली पदार्थांचे दलाल आमिष दाखवत उभे असतात. रेव्ह पार्ट्यांमध्ये यासाठीच तर हॉलिवूड-बॉलिवूडचे तारे किंवा त्यांच्या मुलांना सामील करुन घेतलं जातं. काही वर्षांपूर्वी एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवली होती; ज्यात फिल्मी दुनियेतील मोठमोठ्या हस्ती होत्या, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. असं का? मी मुंबईत शिकत होतो तेव्हा पाहायचो, ज्या पानाच्या दुकानात भगवान शंकरांची तसबीर असायची तेथे गांजा, चरस हमखास विकला जात असे. शंकराची तसबीर ही याची खूण; की इथे अमली पदार्थ मिळतील. खुलेआम हा धंदा चालत असे. त्यानंतर नशेत चूर असणाऱ्या हिप्पींचे भारतात आगमन झाले. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर ते पडून असायचे. तेथे अमली पदार्थांची उलाढाल करणारी संस्कृती निर्माण झाली. त्यात सेक्सही होताच. त्यानंतर पूर्ण देशात अमली पदार्थांचा कारभार सुरू झाला. या कारभाराची आर्थिक व्याप्ती दोन लाख कोटींच्या घरात ती असावी असा अंदाज आहे पण स्थिती त्यापेक्षा गंभीर असावी,  असे मला खात्रीने वाटते. जगातले सर्वात मोठे माफिया अमली पदार्थ विक्रेते आहेत. शस्त्रे विकणारे दुसऱ्या नंबरवर असतात. दोघेही एकमेकांशी जुळलेले आहेत आणि त्यांचे लागेबांधे दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत.

अमली पदार्थांच्या कारभारात भारत जगातल्या पहिल्या दहा प्रमुख देशात मोडतो. भारतात अमली पदार्थांची मोठी विक्री होते. भौगोलिक स्थितीमुळे भारत हे वितरणासाठी सोयीचे केंद्र ठरते आहे.जगात उत्पन्न होणाऱ्या अमली पदार्थांपैकी ४० टक्के अफगाणिस्तानात तयार होतात. तस्करीच्या मार्गाने ते भारतात आणून येथे प्रक्रिया केली जाते. नंतर हे तयार पदार्थ जगाच्या विविध भागात पाठवले जातात. अमली पदार्थांविरुद्ध आपल्याकडे दुर्दैवाने कायदे कडक नाहीत. सिंगापूरसारख्या देशात अमली पदार्थ बाळगण्याला फाशीची शिक्षा आहे. आपल्याकडे अशी तरतूद झाली पाहिजे. अमली पदार्थाविरुद्ध आपल्याला प्रशासनिक आणि सामाजिक स्तरावरही लढावे लागेल. अमली पदार्थाच्या काळ्या दुनियेत ढकलले जाण्यापासून आपली मुले वाचवायची तर सजग राहावेच लागेल. 

एसीबी संचालक समीर वानखेडेंशी एकदा बोलत होतो. मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही विदर्भाच्या मातीत, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलात. विदर्भाची माती स्वातंत्र्याची माती आहे. तुम्हाला संधी मिळालीय, आईवडिलांचे संस्कार आहेत, आता तुम्ही या अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अजिबात सोडू नका’. त्यांनीही मला वचन दिले, ‘मी प्रामाणिकपणे यावर आघात करीन’.- ते तसे करत आहेत याचा मला आनंद आहे. राजकारण्यांनी एकजुटीने त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील पारिवारिक संस्कार असे आहेत, की ड्रग्जचा कारभार ते नक्कीच नेस्तनाबूत करतील.

जाता जाता : एकदा एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉक्टरशी बोलत होतो. शस्त्रक्रिया करण्याच्या आधी ते रुग्णाला विचारतात, तुम्हाला काही व्यसन नाही ना? आश्चर्य म्हणजे ८० टक्के तरुण सांगतात की, ते कोणती ना कोणती नशा करतात. नशा करणाऱ्या या मुलांमध्ये तुमचा मुलगा/ मुलगी तर नाही ना?

Web Title: Dark nights of drugs, sex and fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.