ठळक मुद्देमोदींचे लांगुलचालन करून उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा कार्यभाग साधणे, हाच निव्वळ गोयल यांचा हेतू होता.

>> संदीप प्रधान

जय भगवान गोयल हे कुणी चरित्रकार किंवा इतिहासकार नव्हे. हे एक मनमौजी गृहस्थ आहेत. शिवसेनेचे दिल्लीतील प्रमुख असताना मनमानी पद्धतीने नियुक्त्या करणे, आंदोलने करणे, यामुळे गोयल हे 'मातोश्री'च्या नजरेतून उतरले. शिवसेना नेतृत्वाने त्यांना अर्धचंद्र दिला. त्यानंतर, आता ते भाजपच्या वळचणीला गेले आहेत. दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गोयल यांना स्वत:करिता व पुत्राकरिता विधानसभेची उमेदवारी हवी आहे. भाजपमध्ये सध्या मोदी-शहा यांची मर्जी संपादन करण्याकरिता जो तो धडपडत असतो, त्यामुळे १२ गावचे पाणी प्यायलेल्या गोयल यांनी मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारी पुस्तिका प्रकाशित केली. मोदींचे लांगुलचालन करून उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा कार्यभाग साधणे, हाच निव्वळ गोयल यांचा हेतू होता. मात्र, ही बातमी टीव्ही वाहिन्यांवर झळकताच देशभरातील शिवभक्त खवळून उठले व ते स्वाभाविक होते. अर्थात, बऱ्याचदा स्वाभाविक उमटणारी प्रतिक्रिया ही ती उमटवण्याकरिता प्रयत्न करणाऱ्यांची हेतूत: खेळलेली खेळी असू शकते, हेच प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या लक्षात येत नाही.

शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा! उदयनराजेंचा खोचक सल्ला

शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर 

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या अतिआत्मविश्वास, बोलघेवडेपणा व मित्रपक्षाला गृहीत धरण्याचा फाजीलपणा यामुळे गमावली आहे. जनतेने कौल न दिलेल्या महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात प्रस्थापित झाले आहे. भाजप नेतृत्वाभोवती रुंजी घालणाऱ्या उद्योगपतींनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला हजेरी लावून महाविकास आघाडीच्या सरकारची उद्योगविश्वातील स्वीकारार्हता दाखवून दिली आहे. त्यामुळे आता देशाच्या राजधानीत जर भाजप पराभूत झाला, तर केंद्रात सत्ता असूनही पायाखालचे जाजम पूर्णपणे खेचले जाऊन आपण तोंडावर पडलोय, असे चित्र देशभर जाईल, अशी भीती भाजप नेतृत्वाला वाटत आहे.

...म्हणून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली; लेखकानं सांगितलं कारण

'सध्या दिल्लीत आहे कधीतरी मुंबईत येतील'; जय भगवान गोयल यांना मनसेचा इशारा

 

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारने आरोग्य व शिक्षण क्षेत्रात बरेच काम केले आहे. शासनाच्या शाळांमध्ये सरकारने दिलेल्या सोयीसुविधा अनेक खाजगी शाळांना अवाक करणाऱ्या आहेत. मोहल्ला क्लिनिक योजनेमुळे बड्या, महागड्या खासगी इस्पितळांमध्ये जाण्याची गरज गोरगरिबांना उरलेली नाही. दिल्लीकरांना फुकट पाणी देणे, महिलांना मेट्रोचा फुकट प्रवास यासारख्या योजनांनी केजरीवाल यांनी अनेक मतदारांची मर्जी संपादन केली आहे. निर्भया बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आम आदमी पक्षाला यश लाभले. दिल्लीतील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याकरिता सीसीटीव्हींचे जाळे सरकारने निर्माण केले आहे. या व अशा अनेक निर्णयांमुळे केजरीवाल यांच्याबाबत मतदारांमध्ये अनुकूल मत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष भोजपुरी कलाकार मनोज तिवारी हे आहेत. मात्र, भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जनतेसमोर ठेवलेले नाही. केजरीवाल यांच्या लोकप्रियतेचा सामना तिवारी हे करू शकतील, याची खात्री भाजपला वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे दिल्लीत भाजपला सर्वच्या सर्व जागांवर यश लाभले. त्यामुळे विधानसभेची निवडणूक ही केजरीवाल विरुद्ध मोदी अशी व्हावी, हाच भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, नागरिकत्व कायदा वगैरे राष्ट्रीय मुद्दे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत चर्चेत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर गोयल यांचे पुस्तक हा मोदींचा चेहरा दिल्लीतील निवडणुकीत चर्चेत आणण्याचा हेतूत: केलेला प्रयत्न असू शकतो किंवा गोयल यांनी लांगुलचालनाकरिता तयार केलेली पुस्तिका पाहिल्यावर ही शक्कल भाजपच्या नेत्यांना सुचलेली असू शकते.

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

... तर भस्मसात व्हाल, मोदींवरील पुस्तकाच्या वादावरुन अमोल कोल्हेंचा संताप

 

महाराष्ट्रात शिवसेना या जुन्या मित्राने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यामुळे भाजप नेत्यांचा तीळपापड झाला आहे. शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडी करण्याकरिता किंवा काँग्रेसला सेनेच्या हिंदुत्वाची बोच लागेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याकरिता भाजप स्वातंत्र्यवीर सावरकर, राम मंदिर वगैरे मुद्दे चर्चेत आणत आहे. काहीवेळा या तीन पक्षांच्या सरकारमध्ये ज्यांना सत्तेचा वाटा मिळाला नाही, अशी अतृप्त मंडळीही भाजपच्या सुप्त हेतूंना पूरक असे खाद्य पुरवत आहेत. गोयल यांनी मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्यामुळे शिवसेना चवताळून उठेल, याची कल्पना असल्याने भाजपने पुस्तिकेच्या प्रसिद्धीचा स्टंट केला.

'जाणता राजा' फक्त शिवाजी महाराज; उदयनराजेंची पवारांवर टीका

उदयनराजेंना छत्रपतीचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या राऊतांना मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

अपेक्षेनुसार खा. संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलीच. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, पण उजव्या विचारसरणीच्या इतिहास लेखकांच्या ऐतिहासिक दाव्यांना कडाडून विरोध करणारा एक मोठा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. तेही या पुस्तिकेमुळे खवळतील, याची भाजपला कल्पना आहे. रामदास स्वामींबाबतचे शरद पवार यांचे ताजे विधान हे त्यांच्या मतदारांना प्रभावित करण्याचाच प्रकार आहे. साहजिकच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज यांनी या वादात उडी ठोकली व परस्परांवर टीकाटिप्पणी सुरू केली. याचे धक्के राज्यातील सरकारला तर बसणार आहेतच, पण मोदींना दिल्लीतील निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणण्याचा हेतूही बहुतांशी सफल झाला आहे.

रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेः शरद पवार

'मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाची महाराष्ट्रात विक्री झाली तर...'; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

 

देशातील महागाईने पाच वर्षांचा उच्चांक गाठला आहे. बेरोजगारीने कळस गाठला आहे. आयटीपासून ऑटोमोबाइल क्षेत्रापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या सर्व प्रश्नांची दिल्लीसारख्या शहरी भागातील निवडणुकीत चर्चा झाली, तर भाजपच्या आर्थिक धोरणांची लक्तरे वेशीला टांगली जातील. मग, मोदींच्या करिष्म्याची झिलई कमी होईल. त्यामुळे मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून आरोपांची राळ उडवून द्यायची आणि मुख्य मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करायचे, हीच या मागील खेळी आहे. दुर्दैवाने आपण सारेच अशा सापळ्यांत अलगद अडकतो.

Web Title: Aaj ke Shivaji Narendra Modi book row: BJP trap for Delhi Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.