ओसाड टेकडीस वृक्षाच्छादित करण्याचा तरुणांचा निर्धार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:30 AM2019-07-24T11:30:05+5:302019-07-24T11:31:07+5:30

निजामपूर : बिजारोपण करण्यास सुरूवात 

Youth's determination to cover deserted hills | ओसाड टेकडीस वृक्षाच्छादित करण्याचा तरुणांचा निर्धार 

टेकडीवर खड्डे खोदून त्यात विविध प्रजातीच्या वृक्षांच्या बिया टाकताना निसर्गप्रेमी तरूण. 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : निजामपूर- लामकानी रस्त्यावर खारीखाण लगतच्या उजाड टेकडीवर निजामपूर जैताणे येथील निसर्ग प्रेमी तरुणांनी या पावसाळी मोसमात उस्फुर्तपणे खड्डे खोदून विविधी प्रकारच्या सुमारे ४००  बियांचे रोपण केले आहे.परिसर फुलविण्याचा त्यांचा मानस आहे .     रविवारी आॅक्सिजन ग्रुप व
निसर्गमित्र तरुणांनी खारीखाण च्या पूर्वेस पाझर तलावा लगत उतरणीवर ओसाड टेकडीस फुलविण्याचे हेतूने तेथे बकम निंब,पापडा(करंजी) व इतर बियांचे रोपण केले.यंदा त्या पाझर तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा झरा सध्या खळाळून वाहतो आहे. पावसाने उगलेल्या हिरवळीतून वाहणारा तो ओढा सर्वांचे लक्ष वेधतो आहे. सध्या  एकही वृक्ष नसलेला टेकडी परिसर निसर्गरम्य होण्यासाठी या तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन रविवार २१ जुलै रोजी खड्डे करून ४०० बियांचे रोपण करण्यात आले आहे. 
कडूनिंब हे कमी पाण्यात व लवकर वाढतात म्हणून त्यांच्या बिया रोवल्या आहेत.  या उपक्रमात डॉ.रमेश येवले, राहुल नावरकर, दादाभाई आजगे, जगदीश मराठे, आनंद बच्छाव, तेजस जयस्वाल, सोजस जयस्वाल, योगेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी तरूण, कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. 

बिया राखून ग्रुपकडे देण्याचे आवाहन 

गावात ज्या लोकांना वृक्षारोपणाची मनस्वी आवड असेल त्यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांच्या बिया राखून ठेवाव्यात तसेच आॅक्सिजन ग्रुप, निसर्ग प्रेमींकडे आणून द्याव्यात, असे आवाहन डॉ रमेश येवले,दादाभाई आजगे यांनी केले आहे.

Web Title: Youth's determination to cover deserted hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे