७४ पेैकी ४५ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:22 PM2020-01-22T23:22:17+5:302020-01-22T23:24:42+5:30

फेब्रुवारी ते डिसेंबरअखेर पाच झाल्यात महासभा

undefined | ७४ पेैकी ४५ नगरसेवक ठरले ‘मौनीबाबा'

Dhule

googlenewsNext
ठळक मुद्देत्यांची फक्त अभिनंदनाची भूमिकाविकास कामांव्यतिरिक्त चर्चा..टॉप टेन नगरसेवकसत्ताधारी झालेत विरोधक : भाजपचे ५० नगरसेवक

चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेत प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक संजय जाधव यांनी वर्षभरात झालेल्या सभेतून सर्वाधिक ३० प्रश्न विचारले आहेत तर नागसेन बोरसे हे २३ प्रश्न उपस्थित करणारे दुसरे नगरसेवक ठरले आहेत़ दरम्यान ७४ पैकी २५ नगरसेवकांनी प्रश्न विचारले तर अन्य ४५ नगरसेवकांनी केवळ श्रध्दांजली व अभिनंदन करण्याचा ठराव करण्याची भूमिका बजावत मौनीबाबा ठरले आहेत़
महापालिकेवर दहा वर्ष राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाची सत्ता होती़ त्यामुळे अनेक वर्ष भाजपला सत्तेपासून दुर राहावे लागले होते़ भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आघाडीच्याच नगरसेवकांना भाजपतर्फे उमेदवारी दिली. त्याचा परिणाम मनपा निवडणुकीत ५० जागा मिळवित भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. महापौर निवडीची पहिली सभा २८ फे ब्रुवारी २०१९ रोजी झाली. यावेळी १९ प्रभागातून निवडून आलेल्या ७४ पैकी ३ नगरसेवकांनी दांडी मारली़ पहिल्या सभेनंतर लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागु झाली़ त्यामुळे ४ महिन्यानंतर २६ जुन २०१९ रोजी घेण्यात आलेल्या दुसऱ्या सभेत ७४ पैकी ५९ नगरसेवक उपस्थित होते़ तर १५ नगरसेवकांनी दांडी मारली होती़
५ पैकी ३ सभेत विचारले प्रश्न- महापौर निवडीनंतर २८ फे ब्रुवारी २०१९, २९ जुलै, २६ जुलै रोजी ३ सभा घेण्यात आल्या होत्या़ त्यात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला व बाल कल्याण, बांधकाम, पाणीपुरवठा या विषयांवर संजय जाधव सर्वाधिक ३० प्रश्न विचारलेले आहेत़ तर त्यात नागसेन बोरसे २३, शितल नवले २२, हर्षकुमार रेलन १८, प्रतिभा चौधरी ८, प्रदिप कर्पे ५, अमिन पटेल ४, सुनिल बैसाणे ३, साबिर शेख यांनी २ प्रश्न विचारलेले आहेत़ तर अन्य १५ नगरसेवकांनी १ प्रश्न विचारला होता़ असे एकूण ११६ प्रश्न विचारले आहे.
४५ नगरसेवक का गप्प- ७४ पैकी ४५ नगरसेवक पुरूष तर २९ महिला नगरसेविका आहेत़ काही नगरसेवक उच्चशिक्षित व कामांचा अनुभव असल्याने त्यांनी सभागृहात चर्चा केली़ मात्र काही पहिल्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांनी सभेत मौन बाळगले़
त्यांची फक्त अभिनंदनाची भूमिका
च्७४ नगरसेवकांपैकी बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवकांना चांगल्या पध्दतीने बोलता येत़ तर काही पहिल्यांदाच निवडून नगरसेवक झाले आहे़ त्यामुळे आपल्या नावाची देखील दखल महासभेत घेतली जावी म्हणून वर्षभरात त्यांनी केवळ अभिनंदन व श्रध्दाजंली असा ठराव करण्यात योगदान दिलेले दिसून आले़
विकास कामांव्यतिरिक्त चर्चा..
च्आपल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणाºया काही नगरसेवकांनी प्रभागातील विकास कामांविषयी न बोलता राजकीय कुरापती काढण्याकडे जास्त भर दिला होता़ तर काहींनी फक्त शंभर टक्के उपस्थिती राहण्यासाठी सभागृहात हजेरी लावली होती़
कसा झाला विकास ?
च्महालॅबचा दिलासा : गरीब व गरजु रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी होण्यासाठी मनपाच्या १७ प्राथमिक आरोग्य केंद्रात महालॅब योजनेअंतर्गत रक्त तपासणी केली जात आहे़
च्बांधकाम परवानगी सुलभ : मनपा नगररचना विभागाकडून शहरातील बांधकामांना आॅनलाईन परवानगी दिली जात आहे़ त्यामुळे नागरिकांचा वेळ तर मनपाला कोट्यावधींचा विकास वसुल होत आहे़
च्अतिक्रमण मुक्त मॉडल रोड : नागरिकांना चांगले मजबूत, टिकाऊ रस्ते मिळावे, सोबतच शहराच्या सौंदर्यात भर पडावी़ यासाठी रेल्वे स्टेशन रोड अतिक्रमण मुक्त करून १० कोटी रुपयांचा निधीतून या रस्त्याचा विकास होत आहे़
च्कचरा संकलनासाठी घंटागाड्या : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपाने २५ कोटी रूपयांचा निधीतून ७९ घंटागाड्यांच्या खरेदी केल्या आहेत़ त्यानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक घंटागाडी ३० दिवस कचरा संकलनाचे कार्य करते़
वर्षभरात काय घडले ?
च्२७ विषय मंजूर : लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्याआधी फेबु्रवारी महिन्याच्या अखेर सभा घेण्यात आली़ त्यात १२ मिनीटाच्या सभेत २७ विषयांना मंजूरी देण्यात आली़
च्सत्ताधारी झालेत विरोधक : भाजपच्या नगरसेवकांनी जयहिंद रस्त्याला विरोध, कचरा संकलक ठेकेदारावर आरोप, मनपाच्या तिजोरीवर डल्ला मारत मारणाºयावर शिक्कामोर्तब केला़
च्मनपाचा अर्थसंकल्प सादर : २६ जुलै २०१९ रोजी झालेल्या महासभेत मनपाचा पहिला ३५८ कोटी १९ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता़
महापौरांचे सभागृह त्याग: विकास प्रभागातील कामे होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांनी सभेत ठिय्या दिला. तर उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी देखील सभागृह त्याग केला होता़
वादग्रस्त विषयांवर सभेत दबावतंत्र....
च्मनपात भाजपचे ५० नगरसेवक आहे़ त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्र वापरले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे..
याविषयांवर झाली अधिक चर्चा....
च्स्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, मोकाट जणावरे व कुत्रे, रस्ते, घंटागाडीच्या तक्रारी अशा प्रश्नावर नगरसेवकांनी सर्वाधिक प्रश्न स्थायी व महासभेत उपस्थित केलेले आहेत़
बेघरांना मिळणार हक्काचा ७/१२...
च्बेघर कुुटुंबांना घर देण्याची महत्वकांशी मोहिम महापालिकेने हाती घेतली आली आहे़ त्यानुसार घोषित, अघोषित, गावठाण १२४ जागा अतिक्रमीत जागेवरील नागरिकांना सात बारा मिळण्यासाठी ठराव केला आहे़
टॉप टेन नगरसेवक
सदस्य प्रश्न
संजय जाधव ३०
नागसेन बोरसे २३
शितल नवले २२
हर्षकुमार रेलन १८
प्रतिभा चौधरी 0८
प्रदिप कर्पे 0५
अमिन पटेल 0४
सुनिल बैसाणे 0३
साबिर शेख 0२
१५ नगरसेवकांनी विचारले- ०१

Web Title: undefined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे