दोन हजार महिला मजुरांना वाटले सनकोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:50 PM2019-11-21T22:50:52+5:302019-11-21T22:51:20+5:30

चिमठाणे ग्रामपंचायतीचे प्रेरणादायी कार्य : प्रतिकूल परिस्थितीत बचावासाठी उपाय; अन्य ग्रा.पं.पुढे ठेवला आदर्श

Two thousand women laborers felt sunset | दोन हजार महिला मजुरांना वाटले सनकोट

दोन हजार महिला मजुरांना वाटले सनकोट

Next


भिका पाटील।
शिंदखेडा : तालुक्यातील चिमठाणे ग्रामपंचायततर्फे नेहमीच लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शेतात काम करणाऱ्या सुमारे दोन हजार महिला मजुरांना प्रतिकूल वातावरणाच्या बचावासाठी सनकोटचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत गावातील गरजू महिलांच्या रोजच्या गरजा ओळखून विविध उपक्रम राबवित असते. त्याची तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला आहे. गावातील शेतात काम करणाºया महिलांना उन्हाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता म्हणून ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून दोन हजार महिलांना सनकोटचे वाटप केले.
या अगोदरही ग्रामपंचायतीने महिलांसाठी ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करून सॅनिटरी नॅपकीनचे मशीन बसवून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. या कामासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र गिरासे यांचे योगदान व सहकार्य नेहमीच असल्याचे सरपंच खंडू भिल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चिमठाणे, दलवाडे, पिंपरी ही ग्रुप ग्रामपंचायत सहा-सात महिन्यांपासून गावातील गरजूंना त्यांच्या गरजा ओळखून विविध प्रकारचे साहित्य ग्रा.पं.ला प्राप्त झालेल्या फंडातून त्यांना वस्तू रुपात पुरवते.
गावातील महीला ह्या शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. शेतात काम करतांना त्यांना ऊन, थंडी व पावसाचा सामना करावा लागतो. तसेच अनेक वेळा कपाशी वेचतांना खाली कपाशीच्या बोंडाचे अणुकूचीदार टोक हाताला लागून जखमाही होतात. या त्रासापासून महिलांची सुटका व्हावी, यासाठी ग्रामपंचायतने १४व्या वित्त आयोगातून इतर कामे न घेता दोन हजार सनकोट खरेदी केले. आणि सरपंच खंडू भिल, योगेंद्र गिरासे व ग्रा.पं. सदस्यांसह कर्मचाऱ्यांंनी ते घरोघरी विरेंद्र्रसिग गिरासे यांच्या सहकार्याने वाटप केले.
सनकोट दिल्यानंतर महिला मजुरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ग्रामपंचायतीने यापूर्वीही लाखो रुपये खर्चून दलवाडे गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र व जनता हायस्कूल अशा तीन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशीन बसवले आहेत. त्यात पाच रुपयांचे नाणे टाकून सॅनिटरी नॅपकीन प्राप्त करून त्याचाही फायदा गावातील महिला घेत आहेत. याबाबत जनजागृतीसाठी आशा वर्कर्सची मदत घेतली जात असून त्यांच्याकडेही सुटे नॅपकीन देऊन त्यांना त्या मोबदल्यात स्वत: योगेंद्र गिरासे नॅपकीनमागे विशिष्ट रकमेचे योगदान देतात, असेही सरपंच भिल यांनी सांगितले. महिलांच्या दैनंदिन गरजा ओळखून त्यांच्या समस्यां समजून अशा पद्धतीने काम करणारी ही ग्रा.पं. इतरांसाठी आदर्श व प्रेरणायी ठरणारी आहे.

Web Title: Two thousand women laborers felt sunset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे