उपजिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:38 AM2021-05-06T04:38:27+5:302021-05-06T04:38:27+5:30

मार्च -एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णसंख्या खूपच वाढली. रुग्णसंख्या वाढत असतांनाच बाहेरून ऑक्सिजन पुरवठा पण वाढला. ...

Two oxygen concentrator machines were admitted to the sub-district hospital | उपजिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दाखल

उपजिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दाखल

Next

मार्च -एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णसंख्या खूपच वाढली. रुग्णसंख्या वाढत असतांनाच बाहेरून ऑक्सिजन पुरवठा पण वाढला. ऑक्सिजन पातळी कमी होऊन ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावण्याची संख्या पण वाढली. मार्च-एप्रिल महिन्यात दोडाईचात ६० जण मरण पावलेत. बऱ्याचदा अस्वस्थ रुग्ण दाखल करत असतानाच मृत होतात. ऑक्सिजन सिलिंडरने ऑक्सिजन पुरविणे त्यात वेळ जातो. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी स्थिर राखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे असते. रुग्णास औषधीबरोबरच ऑक्सिजनची गरज भासते. अनेकदा ऑक्सिजनयुक्त बेड मिळत नाही. अशावेळी ऑक्सिजन युक्त बेड मिळेपर्यंत रुग्णास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनने तत्काळ बाहेरून ऑक्सिजन दिल्यास जीवदान मिळू शकते.

उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध झाले असून त्याची चाचणी पण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी भूषण काटे यांनी दिली .

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन हवेच्या माध्यमाने दिवसाला पाच लिटर ऑक्सिजनची निर्मिती करते. एवढा ऑक्सिजन एका रुग्णास पुरेसा असतो.

Web Title: Two oxygen concentrator machines were admitted to the sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.