ट्रॅव्हल्स-जीपची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:11 PM2020-08-10T22:11:34+5:302020-08-10T22:11:58+5:30

बोराडी / पळासनेर : तीनजण जखमी, सांगवी पोलिसात गुन्हा दाखल

Travels-Jeep collided head-on | ट्रॅव्हल्स-जीपची समोरासमोर धडक

ट्रॅव्हल्स-जीपची समोरासमोर धडक

Next

बोराडी/पळासनेर :ट्रॅव्हल्स व जीप यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले हा अपघात बोराडी-सांगवी रस्त्यावरील काळ्यापाण्याच्या धरणाजवळ सकाळी ७.३० वाजता झाला.
सेंधव्याकडून बोराडीकडे येणारी जीप (क्र.एमएच ३४-के १८०८) व शिरपूरकडून सेंधव्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स (क्र.जीजे २६-टी५३४१) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात संदीप रामदास बडगुजर (२५), सिद्धेश्वर भगवान पाटील (१६), सागर गणेश बडगुजर (१६) हे जखमी झाले. अपघातात जीपचा चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक पसार झाला.
अपघाताचे वृत्त बोराडी गावात समजताच माजी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, यांनी स्थानिक युवकांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले.
यासाठी बबन पाटील, शंशाक रंधे, विशाल पाटील, कांतिलाल पाटील, सतिष कोळी, दिलीप ठाकूर, बाळा चौधरी, शिवा पाटील, संजय पाटील, भगवान बडगुजर, बापू बडगुजर,किरण बडगुजर यांनी सहकार्य केले. याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झालेला आहे.

Web Title: Travels-Jeep collided head-on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे