शिरपुरच्या तहसीलदारांनी सिनेस्टाईलने खाजगी वाहनातून पाठलाग करुन पकडले वाळूचे दोन ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:47 PM2020-11-20T12:47:39+5:302020-11-20T12:47:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांनी शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर ...

Tehsildar of Shirpur chases Cinestyle in private vehicle and seizes two sand tractors | शिरपुरच्या तहसीलदारांनी सिनेस्टाईलने खाजगी वाहनातून पाठलाग करुन पकडले वाळूचे दोन ट्रॅक्टर

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांनी शिरपूर तालुक्यातील खर्दे गावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली . गुरुवारी दुपारी खाजगी वाहनाने सिनेस्टाईलने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला आणि दोन वाळूचे ट्रॅक्टर पकडले.
शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन आणि वाळू चोरी करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांनी गेल्या महिन्यात पाठलाग करुन वाळू चोरी करणारे वाहन पकडले होते. त्यांच्या या कारवाई नंतर आबा महाजन यांच्या हालचालीवर वाळू माफियांनी बारीक नजर ठेवत होते. त्यामुळे आबा महाजन यांना वाळू चोरी पकडण्यात अडचण होती. म्हणून तहसीलदारांनी गुरुवारी दुपारी स्वत:चे शासकीय वाहन न वापरता खाजगी वाहनाद्वारे वाळू माफियांवर पाळत ठेऊन होते. गुरुवारी दुपारी त्यांनी खाजगी वाहनाद्वारे पाठलाग करुन दोन ट्रॅक्टर पकडले, त्यानंतर सदर वाहन हाती लागले असून तसेच सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव चेतन कैलास मराठे,राकेश सुदाम कोळी यांचे असून विना नंबरचे ट्रॅक्टर तहसीलदार व त्यांच्या पथकाने भरलेल्या रेतीसह ट्रॅक्टर पकडले.याप्रसंगी मंडळ अधिकारी प्रशांत ढोले,तलाठी गुरुदास सोनवणे,ज्ञानेश्वर बोरसे,वाहन चालक सतीश पाटोळे होते.या कारवाईमुळे अनेक अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.तहसीलदार आबा महाजन यांनी केलेल्या कारवाईमूळे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Tehsildar of Shirpur chases Cinestyle in private vehicle and seizes two sand tractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.