Tapi scheme leaks near Jamafal dam | जामफळ धरणाजवळ तापी योजनेला गळती
जामफळ धरणाजवळ तापी योजनेला गळती

धुळे : तापी पाणी पुरवठा योजनेला जामफळ धरणाजवळ गळती लागली आहे़ यातून हजारो लिटर पाणी अक्षरश: मातीमोल होत असल्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे़ 
तापी पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून धुळे शहरातील जवळपास ६० टक्के भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो़ वेळोवेळी याच योजनेला गळती लागत असल्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद देखील करण्यात येत असते़ ज्या ज्या वेळेस तापी योजनेला गळती लागते, त्यावेळेस दुरुस्तीचे काम देखील मार्गी लावण्यात येत असते़ असे असुनही या योजनेला वारंवार गळती लागत असल्याने त्यातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असते़
दुरुस्तीची मागणी
तापी पाणी पुरवठा योजनेला गळती लागत असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी धुळे शहरापर्यंत पोहचत नाही़ पाणी येत असताना फार उशिर लागतो़ या पार्श्वभूमीवर या योजनेला ज्या ठिकाणी गळती लागलेली असेल अशी सर्व लहान-मोठी ठिकाणे शोधून त्यांची कायमस्वरुपी दुरुस्ती करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे़ 
गळतीचा शहरावर प्रभाव
तापी योजनेला गळती लागल्यानंतर त्याचा परिणामी शहरातील पाणी वितरणावर होत असतो़ परिणामी पाणी सोडण्याची वेळ चुकत असल्याचे दिसते़ 

Web Title: Tapi scheme leaks near Jamafal dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.