धुळ्यानजिक उभ्या कंटेनरला टँकरची धडक, १ जागीच ठार, दुसऱ्याचाही मृत्यू झाल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 12:08 PM2020-10-22T12:08:16+5:302020-10-22T12:08:52+5:30

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर नगाव शिवारात रस्त्याच्या बाजुला कंटेनरच्या पंक्चरचे काम गुरुवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ...

Tanker hits a vertical container near Dhule, 1 killed on the spot, another killed | धुळ्यानजिक उभ्या कंटेनरला टँकरची धडक, १ जागीच ठार, दुसऱ्याचाही मृत्यू झाल्याची शक्यता

धुळ्यानजिक उभ्या कंटेनरला टँकरची धडक, १ जागीच ठार, दुसऱ्याचाही मृत्यू झाल्याची शक्यता

Next

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर नगाव शिवारात रस्त्याच्या बाजुला कंटेनरच्या पंक्चरचे काम गुरुवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास सुरु होते़ अशातच भरधाव वेगाने येणाºया दुधाच्या टँकरने उभ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली़ या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला़ दोन जणं गंभीररित्या भाजले गेले आहेत़ घटना लक्षात येताच जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ उपचार घेताना दुसºयाचा मृत्यू झाल्याचे ऐकिवात असल्याची माहिती पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांनी दिली़ घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम मार्गी लावले जात आहे़ दरम्यान मृत झालेल्या दोघांचीही नावे समजू शकलेली नाही़ पोलिसात अपघाताची नोंद घेण्यात आली असून तपास सुरु आहे़

Web Title: Tanker hits a vertical container near Dhule, 1 killed on the spot, another killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे