Take care of four-legged dogs, do you have to name them too! | चार पायांच्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, त्यांचीही नावे सांगावी लागतील का !

चार पायांच्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, त्यांचीही नावे सांगावी लागतील का !

स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची निवड झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांची आणि सभापती यांचीही कदाचित ही शेवटीची सभा असल्याने बैठकीत अनेकांनी भाषणातून सगळ्यांचा निरोप घेतला.

नगरसेवक बंटी मासुळे यांनी एलईडी दिव्यांचा विषय मांडला. महिना उलटला तरी ठेकेदाराला कार्यादेश का दिला गेला नाही. त्यावर उपायुक्तांनी कारवाई सुरू आहे. येत्या दोन तीन दिवसात हा विषय मार्गी लागेल, असे सांगितले.

भारती माळी यांनी भूमिगत गटारींचे चेंबर रस्त्यावर उंचावर बांधण्यात आल्याने अपघात होत आहे. ठेकेदाराला सांगूनही सुधारणा होत नाही याला जबाबदार कोण, असा सवाल केला. मजिप्रा आणि ठेकेदाराच्या गलथान कारभाराविरोधात तुम्ही स्वत मजिप्रा ठेकेदाराला आरोपी करून तक्रार नोंदवा, असे सभापतींनी सांगितले.

सभापती सुनील बैसाणे यांनी समारोपाच्या भाषणात आजची बैठक शेवटची ठरू शकते. पण प्रशासन काही महत्त्वाचे विषय असले तर विशेष बैठक बोलवू शकते. पण काहींना मला निरोप देण्याची घाई झाली आहे. मी सभापतिपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पद्‌भार सोडला तरी मी स्थायीत आहेच, असे सांगून सर्वांचे आभार मानले.

Web Title: Take care of four-legged dogs, do you have to name them too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.