संडे हटके बातमी  : लाल रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरत नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:35 PM2019-09-08T12:35:55+5:302019-09-08T12:36:05+5:30

दावा खोटा । केवळ अंधश्रध्दा असल्याचा प्रकार

Sunday Hot News: Dogs aren't scared of red water! | संडे हटके बातमी  : लाल रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरत नाहीत !

संडे हटके बातमी  : लाल रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरत नाहीत !

Next

वसंत कुलकर्णी । 
धुळे : एखाद्या घटनेविषयी कुणी काही अफवा पसरवली की ती घटना वाºयासारखी पसरते आणि त्या अंधश्रद्धेचे अनुकरण सुरु होत. अशीच अफवा म्हणजे रंगीत पाणी भरून बाटली घर अथवा कार्यालयापुढे ठेवल्यास कुत्रे, पक्षी व प्राणी दारात येत नाहीत म्हणून शहरात ठिकठिकाणी लाल पिवळ्या रंगाचे पाणी भरुन ठेवलेल्या बाटल्या सध्या अनेक घरांच्या, इमारतींचा बाहेर व चारचाकी वाहनांच्या टपावर दिसतात. 
   मात्र या अशा उपायाला व घटनेला कोणताही शास्त्रीय आधार नसून निव्वळ गैरसमज म्हणून अनेक जन निव्वळ ऐकीव माहितीवर असे उपाय करत आहेत. या बाटलीत लाल पाणी भरून ठेवल्यास कुत्री व पक्षी त्या परिसरात विष्ठा करत नाहीत म्हणून हा उपाय करत असल्याचं अनेकांचे म्हणणे आहे. मात्र यात कोणताही शास्त्रीय आधार नाही. दोन वर्षापूर्वी देखील अशीच बालकत्रीची अफवा जिल्ह्यासह खान्देशात पसरली होती. की रात्री अंधारात कुणी तरी येते व महिलांचे केस कापून नेते़ उपाय म्हणून लाल कुंकू किंवा रंग पारदर्शक बाटलीत भरून दारा बाहेर ठेवल्यास घराचे संरक्षण होते म्हणून त्या वेळी देखील घरा पुढे रंगीत पाणी असलेल्या बाटल्या पहायला मिळत होत्या़ या अफवेचा देखील अनेकांनी धसका घेतला होता. 
ग्रामीण भागात तर काठी घेऊन रात्री जागता पहारा दिला जात होता. मात्र हे प्रकरण देखील अंधश्रध्दा ठरले होते. या अशा अफवा सोशल मिडीयाच्या गैरवापराचे उदाहरण म्हणावे लागेल. कुणी ही या अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे़ याकामी आता सर्वसामान्य नागरीकांनी अंधश्रध्देपासून दूर होण्याची गरज आहे़ 
रंगीत पाणी भरुन ठेवणे हा एक प्रकारचा गैरसमज  नागरिकांमध्ये वाढत आहे़ ही निव्वळ अंधश्रद्धाच आहे. नागरिकांनी अशा अंधश्रध्दांना बळी पडू नये़ त्यासाठी नागरीकांनी सजग असावे़  
- डॉ.सुरेश बिºहाडे,
धुळे जिल्हा कार्याध्यक्ष अंनिस
तसे पाहता कुत्र्यांना रंग आंधळेपणा असतो़ ते पाण्यातील रंग ओळखू शकत नाहीत़ मात्र, बाटली विषयी अप्रूप म्हणून ते लांब पळत असावेत, असा अंदाज आहे़ रंगीत पाण्याच्या बाटलीच्या उपायात वैज्ञानिक असा काही अर्थ नाही.
-डॉ. संदीप देवरे, 
       पशुधन अधिकारी धुळे  

Web Title: Sunday Hot News: Dogs aren't scared of red water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे