विद्यार्थ्यांनी व्यक्त केली शिक्षकांप्रति कृतज्ञता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:16 PM2019-09-07T12:16:53+5:302019-09-07T12:17:09+5:30

जिल्हाभरात उपक्रम : शाळा, महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धेसह विविध कार्यक्रम

The students expressed their gratitude to the teachers | विद्यार्थ्यांनी व्यक्त केली शिक्षकांप्रति कृतज्ञता 

कुसुंबा येथील एन.एन.सी. महाविद्यालयात डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजनप्रसंगी प्रा.डॉ.दिपिका चौधरी, प्राचार्य एन.टी. थोरात, उपप्राचार्य प्रा.प्रदिप सुर्यवंशी, प्रा.एम.जी. कासार, प्रा.प्रदिप सुर्यवंशी आदी.

Next


धुळे : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस  शिक्षकदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन गुरुंप्रति आदर व्यक्त केला.
आर.सी.पटेल प्राथमिक शाळा
शिरपूर- येथील सुभाष कॉलनीतील आर.सी. पटेल प्राथमिक शाळेत शिक्षकदिनानिमित्त इ.७ वीचा विद्यार्थी प्रणय मुकेश भावसार याने मुख्याध्यापकांची भुमिका साकारली. नर्सरी ते इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारुन कृतज्ञता व्यक्त केली. कविता सोनवणे यांनी  मनोगत व्यक्त केले. विजय  शिरसाठ, दीपिका पाटील व ऋतुजा पाटील यांनी ‘गुरूमहिमा’ यावर कविता व गुरू प्रार्थना सादर केली. उज्वला दायमा यांनी शालेय ग्रंथालयाला ग्रंथ खरेदीसाठी ५०१ रूपये मुख्याध्यापक महेंद्र परदेशी यांच्याकडे सुपूर्द कले. सुत्रसंचालन संगिता जाधव तर आभार प्रदर्शन ज्वाला मोरे यांनी केले.   
टेकवाडे माध्यमिक विद्यालय
शिरपूर- तालुक्यातील टेकवाडे येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात डॉ़राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन  प्राचार्य सिद्धार्थ पवार, पर्यवेक्षक बी.एस. जमादार, विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी केले़ प्राचार्यांची भूमिका भाग्यश्री गिरासे हिने साकारली. एस.पी. महाजन व एस.एम. पाटील यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगितले़ सुत्रसंचालन किंजल विठ्ठल लोहार व पराग दिलीप वानखेडे यांनी केले़
सी.डी. देवरे विद्यालय
म्हसदी- येथील सी.डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त संदीप सोनवणे, सौरभ देवरे, अभिजीत देवरे, साक्षी देवरे, हर्षाली पाटील, धनश्री पाटील, प्राची पाटील, श्वेता पाटील, भावेश देवरे आदी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. तसेच मुख्याध्यापकांची भूमिका अश्विन काकुळते, लेखनिक- हर्षल पगारे, शिपाई उदय पवार व यश पवार यांनी साकारली. दुसºया सत्रात मुख्याध्यापक एस.ए. देवरे यांनी डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यादवराव देवरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन कीर्ती देसले व माहेश्वरी काकुस्ते यांनी केले तर आभार जी.आर. देवरे यांनी मानले.
हस्ती पब्लिक स्कूल
दोंडाईचा- येथील हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअरकॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी हस्ती स्कूलचे स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ.विजय नामजोशी व प्राचार्य हरिकृष्णा निगम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमि माखीजा या विद्यार्थिनीने केले. इयत्ता आठवी ते दहावीच्या एकुण १२० विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक विभाग, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भूमिका साकारल्या. यावेळी ओवी बिरारीस, अमृता पाटील, नंदिनी मिहानी या विद्यार्थिनींनी तसेच शिक्षिका माधुरी राजपूत यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी धीरज गुजराथी याने केले. 
अहिल्यापूर विद्यालय
शिरपूर- अहिल्यापूर येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला़ यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची भूमिका साकारुन अध्यापनाचा अनुभव घेतला. यावेळी मुख्याध्यापक आर.बी. भदाणे, आर.पी. जोशी यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

कुसुंबा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
नेर- कुसुंबा येथील श्रीमती एन.एन.सी. महाविद्यालयात शिक्षकदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.टी. थोरात होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव प्रा.डॉ.दिपिका अनिल चौधरी यांच्याहस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एम.जी. कासार, उपप्राचार्य प्रा.प्रदिप सुर्यवंशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर. चौधरी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.एस.पी. पवार तर आभार प्रदर्शन प्रा.जी.ओ. चौधरी यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: The students expressed their gratitude to the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे