वादळी पावसामुळे पिके जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 10:19 PM2019-10-04T22:19:41+5:302019-10-04T22:20:03+5:30

बोरकुंड परिसर : पंचनाम्याची जोरदार मागणी

Storms ravage crops | वादळी पावसामुळे पिके जमीनदोस्त

वादळी पावसामुळे पिके जमीनदोस्त

Next

धुळे : तालुक्यातील बोरकुंड परिसरात गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसातुन उसंत मिळाली नाही तेवढ्यात पुन्हा शुक्रवारी वादळी वाºयासह मुसळधार पावसामुळे हाती आलेले पिक पुर्णपणे उध्वस्त झाले आहे़
गेल्या १५ दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसापासुन खोळंबलेल्या शेतीच्या कामांसाठी एक-दोन दिवस उसंत मिळाली नाही तोवर शुक्रवारी दुपारी पुन्हा वादळीवाºयासह मेघ गर्जना होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली़ क्षणार्धात  सर्व पिके जमीनदोस्त झाली़ मोठ- मोठी झाडे उन्मळून पडली़ याशिवाय आदिवासी वस्तीतील बहुतेक घरांना मोठ्या प्रमाणात हानी पोहचली आहे़
गेल्या ५ - ६ वर्षापासुन बोरकुंडसह परिसरात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत होता़ मात्र, यावर्षी सुरुवातीपासुन सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्याने हातची पिके ही झालेल्या तणामुळे व रोगाच्या पादुभार्वामुळे वाया न जाऊ देता अव्वा च्या सव्वा रोजंदारी देवुन जिवाच्या आकंताने वाढवलेली पिके आजच्या पावसामुळे जमीन दोस्त झाली़ परिणामी सर्व शेतकºयांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे़ शासकीय अधिकारी यांनी आचारसंहितेची टांगती तलवार शेतकºयांच्या मानगुटीवर न ठेवता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन उपाययोजना उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी बोरकुंडचे सरपंच    बाळासाहेब भदाणे यांनी केली आहे़
बळीराजाच्या डोळ्यात अश्रू
शुक्रवारी अचानक आलेल्या पावसामुळे बोरकुंडसह परिसरातील शेतकºयांची चांगलीच धावपळ झाली़ पिके वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली़ परंतु वारा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बळीराजा शेवटी हतबल ठरला़ उभी पिके जमीनदोस्त झाल्याने काहींच्या डोळ्यात पाणीच आले़ 

Web Title: Storms ravage crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे