संचारबंदीचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे नोंदवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 09:40 PM2020-05-16T21:40:40+5:302020-05-16T21:41:09+5:30

संडे अँकर । जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश, आदेश मिळताच रस्त्यावर फिरणाऱ्यांची होतेय कसून चौकशी

Report a direct violation of the curfew! | संचारबंदीचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे नोंदवा!

संचारबंदीचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे नोंदवा!

Next

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या हद्दीत १७ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन (संचारबंदी) घोषीत करण्यात आली आहे़ संचारबंदीच्या या कालावधीत फिरस्ती करुन संचारबंदीचे उल्लंघन करुन फिरणाºया व्यक्ती, संघटनांच्या विरोधात नियमानुसार गुन्हे दाखल करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संजय यादव यांनी दिले़
कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहितेअन्वये धुळे महापालिका क्षेत्रासाठी कोविड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून १७ मे २०२० पर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत़ मात्र संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे नागरीकांकडून काही प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहे़ या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आपल्या स्तरावर झोन / वार्ड तयार करुन या झोनसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांची झोनल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी़ झोनल अधिकाºयांनी गुन्हे नोंदवावेत़
तक्रार निवारण कक्ष करा
झोनल अधिकाºयांनी फिरस्ती करुन संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्ती, संघटनांचे मोबाईलवरुन चित्रीकरण करुन त्यांच्या विरोधात नियमानुसार गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही करावी़ नागरीकांना तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात यावी़ मोबाईल नंबर देवून त्यावर येणाºया तक्रारीची दखल घेण्यात यावी असेही आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले़
लक्ष ठेवण्याची आवश्यकता
संचारबंदी असूनही त्याचे उल्लंघन केले जात आहे़ त्यामुळे अशा लोकांवर पोलिसांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे़ नियमांचे उल्लंघन करणाºयांना दंडनीय योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे आदेश पारीत झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली़

Web Title: Report a direct violation of the curfew!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे