१९ व्या वर्षीच स्वातंत्र्य संग्रामात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:47 PM2019-08-14T22:47:01+5:302019-08-14T22:47:19+5:30

स्वातंत्र्य सैनिक भिलाभाऊ कुंवर  : कापडणे येथे शेतकºयांना संघटीत करून केला सत्याग्रह

Participation in the freedom struggle at the age of 7 | १९ व्या वर्षीच स्वातंत्र्य संग्रामात सहभाग

१९ व्या वर्षीच स्वातंत्र्य संग्रामात सहभाग

Next

सुनील साळुंखे । 
शिरपूर : देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी स्वातंत्र्य संग्रमात उडी घेतली. त्यापैकी एक असलेले शिरपूर तालुक्यातील विखरण येथील  स्वातंत्र्य सैनिक असलेले भिलाभाऊ लकडू कुंवर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी १९४२च्या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींसमवेत सहभाग घेतला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरूंगवासही भोगला. 
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर ९९ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक भिलाभाऊ कुंवर यांनी स्वातंत्र्य संग्रमातील आठवणींना उजाळा दिला.
 भिलाभाऊ कुंवर यांचा जन्म २५ मे १९२२ रोजी विखरण  येथे झाला़  १९३३ मध्ये कापडणे येथे शिक्षणासाठी गेले. कापडणे येथील ४२ शेतमजुरांना संघटीत करून त्यांच्यासह धुळे येथे सत्याग्रह केल्याने,  त्यांना एक दिवस व रात्रभर उपाशी ठेवून सोडून देण्यात आले़ पुन्हा अटक व्हावी म्हणून त्यांनी धुळे-देवभाने दरम्यान टेलिफोन खांबाची मोडतोड केली़ तारा तोडल्या, रस्त्यावर झाडांच्या फांद्या टाकून       रहदारीस अडथळा निर्माण केला़ एवढे करूनही त्यांना अटक झाली नाही़
कापडणे येथे २ आॅक्टोंबर १९४२ला त्यांना अटक करण्यात आली़ सोनगीरच्या पोलिस कस्टडीत एक महिना ठेवले.  १४ नोंव्हेंबर १९४२ रोजी शिंदखेडा न्यायालयाने  आठ महिन्याची शिक्षा ठोठावली.  त्यांनतर त्यांना नाशिकच्या जेलमध्ये रवाना केले. या आठ महिन्याच्या तुरूंगवासाच्या काळात त्यांची धर्मपत्नी केशरबाई कुंवर यांनी आटापाटी व औंध संस्थानच्या राजीधानीच्या गावी धुळे जिल्ह्यातील व सातारा-सांगली जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील व त्यांच्या भूमिगत सहकाºयांची जेवणाची काळजी घेतली़ दिवसा भाकरीच्या पाटीत शस्त्रास्त्रे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी पार पाडली़
हैद्राबाद संस्थान विलीनीकरणावेळी सुलतान बाजारातील रघुनाथबाग चौकात जयप्रकाश नारायण आले असतांना सभा उधळून लावण्यासाठी निजाम सरकारने काशिम रजवी यांच्या आदेशान्वये पोलिसांनी लाठीमार केला़ त्या लाठीमारात ते गंभीर जखमी झाले. सन १९५६ ते १९७७ अशी तब्बल २१ वर्षे किसान विद्या प्रसारक संस्थेचे ते व्यवस्थापक होते़ १९७४ मध्ये स्व़इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपत्र व मानपत्र धुळे येथील जि़प़च्या सभागृहात तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते कुंवर यांना सुर्पूद करण्यात आले आहे़ सेवानिवृत्तीनंतर ते अध्यात्मिक वर्गाकडे वळलेत़ 

Web Title: Participation in the freedom struggle at the age of 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे