बोगस लाभार्थ्यांना रक्कम जमा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:11 PM2020-02-27T13:11:22+5:302020-02-27T13:11:43+5:30

थाळनेर : घरकुल घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु

Order to deposit money to bogus beneficiaries | बोगस लाभार्थ्यांना रक्कम जमा करण्याचे आदेश

dhule

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
थाळनेर : घरकुल घोटाळाप्रकरणी तक्रारींच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी वाय.डी. शिंदे यांनी नुकतीच थाळनेर ग्रामपंचायतीत येऊन सविस्तर चौकशी केली. तसेच या प्रकरणातील चुकीचा लाभ घेतलेल्या दोषींना ७ दिवसाच्या आत रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरपूर पंचायत समितीने घरकुल यादीतील प्रपत्र ब यादीतील लाभार्थ्यांच्या अपूर्ण नावामुळे दुसऱ्याच्या खात्यावर घरकुलाची रक्कम टाकली होती. याबाबत लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे माहिती मागितल्यानंतर सदर गैरप्रकार लक्षात आला. याबाबत २६ जानेवारी २०२० रोजी झालेल्या ग्रामसभेत मोठा गदारोळ झाल्याने यावेळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दोघा लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ सन २०१६-१७ व २०१८-१९ मध्ये देण्यात आला होता. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी वाय डी शिंदे, विस्तार अधिकारी एस.एस. पवार यांनी ग्रा.पं.ला भेट दिली. गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेतील लाभार्थी व ज्यांना चुकीचा लाभ दिला आहे, त्यांचे बँकेचे पासबुक व बँकेतील माहिती घेतली. तसेच ग्रामपंचायत दप्तराची तपासणी केली. यावेळी ज्यांनी लाभ घेतला त्या लाभार्थ्यांनी रक्कम परत करण्याचे लेखी लिहून दिले. गटविकास अधिकाºयांनी लाभार्थ्यांना सात दिवसाच्या आता शासनाकडे रक्कम जमा करण्याचे तोंडी आदेश दिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी वेताळेही उपस्थित होते.

Web Title: Order to deposit money to bogus beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे