केवळ ११ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:26 AM2020-11-21T11:26:24+5:302020-11-21T11:26:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ११ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. धुळे शहरातील सहा तर ग्रामीण भागातील ...

Only 11 reports positive, no deaths | केवळ ११ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी ११ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. धुळे शहरातील सहा तर ग्रामीण भागातील पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ७७१ इतकी झाली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ११८८ अहवालांपैकी धुळे शहरातील गुलमोहर कॉलनी येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. व उर्वरित ११८७ अहवाल निगेटिव्ह आले.
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या ३७६ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, लोहगाव व शिंदखेडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व ६४अहवाल निगेटिव्ह आले.
भाडणे साक्री येथील कोविड केअर केंद्रातील सर्व २५८ अहवाल निगेटिव्ह आले.
तसेच रॅपिड अँटीजन टेस्टचा १ अहवाल पॉझिटिव्ह आला.
महानगरपालिकेच्या कोविड केअर केंद्रातील रॅपिड अँटीजन टेस्टचे सर्व १३२ अहवाल निगेटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १९ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, धुळे शहरातील ३, साक्री व शिरपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेतील २३ अहवालापैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात धुळे व सुदर्शन कॉलनी येथील एकाच समावेश आहे.

Web Title: Only 11 reports positive, no deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.