पिंपळनेर उपबाजार समितीत कांद्याचे भाव घसरले, शेतकरी हवालदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 11:58 AM2019-10-02T11:58:35+5:302019-10-02T11:58:53+5:30

कांद्यावरील निर्यात बंदी तसेच व्यापाऱ्यांवरील खरेदीचे निर्बंध उठविण्याची मागणी

Onion prices fall in Pimpalner sub-market committee, farmers say | पिंपळनेर उपबाजार समितीत कांद्याचे भाव घसरले, शेतकरी हवालदील

पिंपळनेर उपबाजार समितीत कांद्याचे भाव घसरले, शेतकरी हवालदील

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
पिंपळनेर (जि.धुळे) : शासनाने कांदा निर्यातवर बंदी घातली आहे. तसेच व्यापाऱ्यांना फक्त ५०० क्विंटलपर्यंतच कांदा खरेदी करता येईल असे बंधन घातले आहे. याचे पडसाद पिंपळनेर उपबाजार समितीत उमटू लागले आहे. या निर्यातबंदी व बंधनांमुळे कांद्याचे भाव घसरत असल्याने, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. शासनाने निर्यातबंदी उठवावी तसेच कांद्याला चांगला भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात कांद्याचे कमी झालेले भाव लक्षात घेता सोमवारी वाढतील अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र शासनाने निर्यात बंदी व व्यापाºयांवर कांदा खरेदीचे बंधने लादल्याने, व्यापाºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. याचे पडसाद कांदा लिलावासाठी आलेल्या शेतकºयांमध्ये दिसून आले. त्यामुळे पिंपळनेर उपबाजार समितीत सोमवारी सायंकाळी पाच वाजता कांद्याचा लिलाव करण्यात आला. कमी झालेले भाव, व्यापाºयंवर लादलेले बंधने यामुले दिवसभर व्यापाºयांसह शेतकºयांचा गोंधळ पाहण्यास मिळाला.
शासनाच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक व्यापारी हा जास्तीत जास्त ५०० क्विंटल माल खरेदी करू शकतो अशी बंधने आल्याने कांदा बाजारात पडून राहण्याची शेतकºयांना चिंता आहे. यामुळे कांद्याला मिळणारे भाव कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
सोमवारी उपबाजार समितीत नेहमीप्रमाणे शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणला असता या ठिकाणी शासनाने कांदा निर्यात बंदी करीत व्यापाºयांवर निर्बंध आणल्याने शेतकºयांनी या घटनेचा निषेध करीत रोष व्यक्त केला. चांदवड येथे झालेल्या व्यापाºयांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पिंपळनेरला दिवसभरात कांद्याला पंधराशे रुपये पासून ते ३४०० रुपयांपर्यंत भाव देण्यात आला. कांदा खरेदीवर मर्यादा आल्याने, अनेक वाहनांचा लिलाव होऊ शकला नाही.
रबीचा हंगाम तोंडावर आला असताना शासनाने घेतलेला निर्णय शेतकºयांना मारक ठरणार अशी चर्चा आहे.
अतिवृष्टीमुळे खरीपाचे पीक हातातून गेल्यामुळे शेतकºयांची मदार फक्त आता कांद्यावर होती त्यातही हा अडथळा आल्याने शेतकरी धास्तावला आहे.

Web Title: Onion prices fall in Pimpalner sub-market committee, farmers say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे