One was arrested by Shirpur police with a pistol | पिस्टलसह एकाला शिरपूर पोलिसांनी पकडले
पिस्टलसह एकाला शिरपूर पोलिसांनी पकडले

धुळे : कारमधुन पिस्टल घेऊन दोन जण जाणार असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार, सापळा लावून पोलिसांनी गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कार पकडली़ तपासणी आणि चौकशी करुन पोलिसांनी दोघांना पकडले़ त्यात इंद्रसिंग गुलाब भील (३८, रा़ वाडी ता़ शिरपूर) याला ताब्यात घेतले़ तर, मंगल पावरा (पूर्ण नाव माहित नाही) (रा़ धडगाव जि़ नंदुरबार) हा पळून जाण्यात यशस्वी ठरला़ पोलिसांनी ३० हजार रुपये किंमतीची पिस्टल आणि एमएच ३९ एबी ३४२८ क्रमांकाची ५ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ याप्रकरणी शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल झाली़ 

Web Title: One was arrested by Shirpur police with a pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.