साडेपाच लाख रुपयांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:22 PM2019-10-02T22:22:36+5:302019-10-02T22:22:52+5:30

धुळे शहरातील घटना : बुधवारी पहाटेची घटना, दागिने व रोख रकमेचा समावेश

One and a half lakh rupees robbery | साडेपाच लाख रुपयांची घरफोडी

dhule

Next

धुळे : शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी साक्रीरोडवरील कुमारनगरात एका व्यावसायिकाकडे घरफोडी करून सोन्यांचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५८ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना २ आॅक्टोंबर रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे चोरी झाली त्या घरातील सर्व सदस्य घरात होते. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे तीन ते चार चोरटे एका कारमधून साक्रीरोड परिसरात आले. सर्वप्रथम त्यांनी साक्रीरोडवरील जोशी गोंधळी कॉलनीत एक दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान फोडत असतांना शटरचा आवाज आल्याने, काही नागरिक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. पुढे कुमारनगरात असलेले मनोज रोहडा यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी काजू बदामाच्या तीन बरण्या लंपास केल्या. तसेच जवळपास १५ ते २० हजाराची रक्कम या ठिकाणाहून लंपास केली.
यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा कुमारनगरातील बेकरी व्यावसायिक ठाकवणी यांच्या ‘शामजी कृष्णा’ या बंगल्याकडे वळविला. या बंगल्याच्या लोखंडीगेटला कूलूप लावलेले होते. चोरट्यांनी कटरच्या साह्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४ लाख ८३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख ७५ हजार रूपये असा एकूण ५ लाख ५८ हजार रूपयांचा माल लंपास केला.
सर्व सदस्य घरातच
दरम्यान चोरीची घटना घडत असतांना ठाकवाणी यांच्या घरातील सर्व सदस्य घरातच गाठ झोपेत होते. सकाळी ७ वाजेनंतर घरच्यांच्या लक्षात घरी धाडसी चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक आर.एम. उपासे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक उगले यांनी भेट देवून पहाणी केली.
याप्रकरणी जगदीश हरीराम ठाकवाणी (वय ४१, रा. ब्लॉक नं. क्यू ४, कुमारनगर, धुळे) यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे करीत आहेत.

Web Title: One and a half lakh rupees robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे