मोकाट गुरांची पोलीस चौकीबाहेर ‘दबंगगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:47 PM2020-01-19T22:47:57+5:302020-01-19T22:48:31+5:30

धुळे शहर : शासकीय कार्यालयाबाहेर आता मोकाट गुरांचा वावर ; मनपाचा कारवाईचा केवळ ‘देखावा’

 Mockat cattle 'bullying' outside police outpost | मोकाट गुरांची पोलीस चौकीबाहेर ‘दबंगगिरी’

Dhule

Next

धुळे : शहरात मोकाट गुरांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे़ महापालिका केवळ कारवाई सोंग केल्याची भूमिका घेत आहे़ शनिवारी रात्री मोकाट गुरांनी एकत्र येवून पाच कंदिल चौक परिसरात असलेल्या शहर पोलिस चौकी बाहेर दंबगिरी करतांना ‘लोकमत’ च्या सर्वेक्षणात दिसून आले़़शहरातील मुख्य रस्ता, चौक, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे मोकाट गुरांचा ठिय्या बसलेला असतो़
‘लोकमत’ शनिवारी रात्री शहरातील आग्रारोड, पाच कंदील, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक अशा परिसरात पाहणी केली असता, ठिकठिकाणी मोकाट गुरे ठिय्या मांडून बसल्याचे दिसून आले. आग्रारोड, संतोषी माता चौकात भाजीपाला विक्रेत व्यवसाय करतात़ रात्री उरलेला भाजीपाला त्याच जागी फेकतात त्यामुळे अशा ठिकाणी मोकाट गुरांचा वावर अधिक असतो.
धुळेकरांसह अधिकाऱ्यांना त्रास
शहरात मोकाट गुरांवर कारवाई केली जात नाही़ पशुपालक गुरांना रस्त्यावर सोडून देतात. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारबाहेर मोकाट गुरांनी ट्यिंा मांडून अधिकाऱ्यांचा रस्ता अडविला होतो. तरीही कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे.
पोलीस चौकीबाहेर ठिय्या
शनिवारी आग्रारोडवर फिरणाºया ५ ते ६ मोकाट गुर एकत्र येऊन त्यांनी पाच कंदील चौक परिसरात असलेल्या पोलीस चौकीकडे आपला मोर्चा वळविला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चौकीवर पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने चार गुरांनी पोलीस चौकीबाहेरचं ठिय्या मांडला होता़ तर एका गुराने दरवाजा समारे येवून हबरडा फोडला़ मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्याने चौकीबाहेर बसणेच पसंत केले.
अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य
ऐरवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाºयांना बघितले जाते. मात्र शनिवारी रात्री मोकाट गुरांनी शहर पोलीस चौकीबाहेर करणारा ठिय्या मांडलेला बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Web Title:  Mockat cattle 'bullying' outside police outpost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे