कॉँग्रेसच्या बालेकिल्यात कमळ फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:04 PM2020-01-10T12:04:51+5:302020-01-10T12:05:09+5:30

शिरपूर तालुका : तीन पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही, भाजपला प्रथमच निर्विवाद यश मिळाले

Lotus blossoms in Congress | कॉँग्रेसच्या बालेकिल्यात कमळ फुलले

कॉँग्रेसच्या बालेकिल्यात कमळ फुलले

Next

सुनील साळुंखे ।
आॅनलाइन लोकमत
शिरपूर : शिरपूर तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र विधानसभा निवडणूक पूर्वी आमदारद्वयींनी भाजपात प्रवेश केल्यामुळे गटात सर्वच्या सर्व जागा पटकावून प्रथमच या पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा रोवला़ तर गट-गणात कॉँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही़
यापूर्वी, या तालुक्यात भाजपाला बोटावर मोजण्या एवढ्या देखील जागा मिळविता येत नव्हत्या़ मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांनी भाजपत प्रवेश केल्याने, तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. केवळ अमरिशभाईच्या करिष्मामुळेच प्रथमच येथील पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. गणाच्या एकूण २८ पैकी २४ जागा भाजपला मिळाल्या. काँग्रेसला गणात भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रवादीने गत वर्षापेक्षा एक जागा गमवून निदान खाते तरी उघडले़ कोडीद, आंबे व रोहिणी गणातील तीन अपक्ष उमेदवार निवडून आलेत़
अमरिशभार्इंमुळेच भाजपाला गटात सर्वच्या सर्व म्हणजेच १४ जागा पटकावून वर्चस्व राखता आले आहे. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपाला केवळ एक जागा मिळविता आली होती़ या निवडणुकीत गटात अन्य पक्षांना संधीच मिळाली नाही़ विशेषत: बालेकिल्ल्यात कॉँग्रेसला एकही जागा राखता आलेली नाही़
विखरण गटात किविप्र संस्थेचे चेअरमन तथा माजी जि़प़सदस्य डॉ़तुषार रंधे हे तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार ४४३ मताधिक्याने विजयी झालेत़ शिंगावे गटात तत्कालीन जि़प़ उपाध्यक्ष देवेंद्र पाटील हे केवळ २१ मतांनी विजयी झालेत़ भाटपुरा गटात विद्यमान जि़प़सदस्य प्रा़संजय पाटील हे देखील ६ हजार ९९१ मताधिक्याने विजयी झालेत़ या तिनही गटात अटीतटीची लढत असल्यामुळे या लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते़
जि.प.चे माजी सदस्य वसंत पावरा यांची पत्नी लताबाई उमर्दा गणात, दहिवद गणात माजी पं़ स़सदस्या आशाबाई पवार, विद्यमान सदस्य बालकिसन पावरा यांची पत्नी खंबाळे गणात रिंगणात होते. ते देखील विजयी झालेत़
विखरण गटात जि़प़सदस्य चंद्रकांत पाटील, सांगवी गटात माजी सदस्य रणजितसिंग पावरा, माजी पं़स़सदस्य कणिलाल पावरा, भाटपुरा गटात पं़स़माजी सदस्य शामकांत करंकाळ, विद्यमान जि़प़सदस्य दत्तु पाडवी पळासनेर गणात, विद्यमान पं़स़सदस्य रहेमान पावरा यांचा नातु रविंद्र वळवी हिसाळे गणात, माजी पं़स़सदस्य पदमसिंग जाधव यांचा पुतण्या योगेश जाधव अजनाड गणात, बोराडी गटात रणजितसिंग पावरा यांची पत्नी साधनाबाई पावरा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: Lotus blossoms in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे