Hang the accused accused of raping them | बलात्कार करणाया आरोपींना फाशी द्या
जिल्हा प्रशासनाला निवेदन देतांना इन्साफ आक्रोश मोर्चा समितीचे पदाधिकारी

धुळे : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षाच्या मुलीच्या बलात्कार व खून खटल्यातील आरोपींना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी इन्साफ आक्रोश मोर्चा संयोजन समितीतर्फे जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय न्यायप्रणालीत फाशीची शिक्षा देतांना खून व तत्सम गुन्हयात दुर्मिळातून दुर्मिळ गुणधर्म तपासून फाशीची शिक्षा दोषींना दिली जाते. कठुआत आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला. ही घटना अतिशय निंदनीय असून, या खटल्यातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
मृत पिडीतेच्या पालकांना निष्पक्ष न्यायालयीन चाचणीचा अधिकार असून, पठाणकोठ विशेष न्यायालयाच्या निकालाविरूद्ध उच्च न्यायालयात सरकारी अधिवक्ता नेमून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी असे प्रयत्न करावेत. तसेच भारतात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार व हत्या करणाºया नरधामांविरूद्ध फाशीची शिक्षा देणारा कायदा अस्तित्वात आणावा. 
कठूआ प्रकरणातील आरोपींना इतकी कमी शिक्षा मिळत असतेल तर असे गुन्हे करणाºयांच्या मनातील कायद्याची भीती नष्ट होऊन असे गुन्हे देशात मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनभावनेचा आदर करून मागणी मान्य करावी अशीही मागणी करण्यात आली. निवेदनावर अ‍ॅड. जुबेर शेख, दाऊस मन्सुरी, कैसर अहमद, समीर काझी, आरीफ अन्सारी, सै.शाहरूख सै.सईद, अशफाक मन्सुरी, रईस काझी, खाटीक अश्पाक, आदींच्या स्वाक्षºया आहेत. 

 


Web Title: Hang the accused accused of raping them
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.