हेअर सलून व्यावसायिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 10:08 PM2020-03-30T22:08:44+5:302020-03-30T22:09:23+5:30

शिरपूर : घरी सेवा देण्याचीही कोरोनामुळे धास्ती, कटींगची सोय नसल्याने नागरिकही बैचेन

 Hair salon strikes professionals | हेअर सलून व्यावसायिकांना फटका

dhule

googlenewsNext

शिरपूर : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा समाजातील कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे़ राज्यातील सलून चालकांनाही संचारबंदीची मोठी झळ बसली आहे़ सरकारने सोशल डिस्टनसिंगचे आवाहन केले आहे़ आमचा मात्र ग्राहकाशी थेट शारीरिक संपर्क होतो, त्यामुळे घरी जावूनही सेवा देणे शक्य नसल्याचे शहरातील करवंद नाक्याजवळील राज मेन्स पार्लरचे संचालक तथा तालुका संघटनेचे अध्यक्ष रामचंद येशी या व्यावसायिकांचे म्हणणे आहे़
संचारबंदी लागू करण्यापूर्वीच सलून चालकांनी आपली दुकाने बंद केली होती़ पुणे व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर तरूण शहरात दाखल झाले आहेत़ भीतीपोटी आपण संचारबंदीपूर्वीच दुकान बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले़ शिरपूर शहरात १४० ते १५० सलून चालक आहेत़ सर्वच दुकाने सध्या संचारबंदीमुळे बंद आहेत़ काही प्रमुख चालकांकडे कारागीर कामाला आहेत़ त्या कारागिरांचीही आता उपासमार होत आहे़ सलून व्यवसाय हा चालक व ग्राहकांच्या मैत्रीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो़ या व्यवसायात ग्राहकांत व चालकांमध्ये आपुलकीचा स्रेहभाव तयार होतो़ अनेकदा पैशांपेक्षा हे संबंध टिकविण्याचा चालक व ग्राहक दोघांकडूनही प्रयत्न असतो़ सेवा क्षेत्रातील हा व्यवसाय असल्यामुळे ग्राहकांना समाधान देण्यात आपल्याला आनंद मिळतो असे रामचंद्र येशी यांचे म्हणणे आहे़ कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने आता सोशल डिस्टनसिंग हा शब्दप्रयोग करत एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचे व गर्दी टाळण्याचे आवाहन किंबहुना सक्ती केली आहे़ त्यामुळे चालक अडचणीत सापडले आहेत़ संचारबंदीमुळे दुकान जरी बंद ठेवले असले तरी अनेक ग्राहक घरी येवून सेवा देण्याची चालकांना विनंती करत आहेत़ वर्षानुवर्षाचा ऋणानुबंध तुटण्याची भीती आहे़ कामादरम्यान थेट शारीरिक संपर्क येत असल्यामुळे मनात भीती आहे़ थोड्याशी पैशांकरीता मोठी जोखीम आहे़ त्यामुळे आम्ही नकार कळवत आहेत़ दाढी व कटींगच्या साहित्याचे निर्जंतुकीकरण केले तरी त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका टळत नाही़ ग्राहकांना प्रत्यक्ष स्पर्श करावाच लागतो असे येशी यांनी सांगितले़ दरम्यान, नाभिक संघटनेने सलून चालकांच्या होणाºया उपासमारीची दखल घेतली आहे़

Web Title:  Hair salon strikes professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे