माजी मंत्री हेमंत देशमुखांचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 06:36 PM2019-07-22T18:36:21+5:302019-07-22T18:36:48+5:30

दोंडाईचा घरकूल गैरव्यवहार प्रकरण : चर्चेला आले उधाण

Former Minister Hemant Deshmukh rejected the bail | माजी मंत्री हेमंत देशमुखांचा जामीन फेटाळला

माजी मंत्री हेमंत देशमुखांचा जामीन फेटाळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या जामीन अर्जावर सोमवारी धुळे येथील न्यायालयात कामकाज झाले़ त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून सायंकाळी प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी डॉ़ देशमुख यांनी ताब्यात घेतले आहे़  
जिल्हा न्यायालयात १९ जुलै रोजी झालेल्या कामकाजात डॉ हेमंत देशमुख यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली होती़ शासनाकडून जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तंवर, तर डॉ.देशमुख यांच्याकडून  सोनवणे,  ओस्तवाल, तर फिर्यादी नगराळे यांच्याकडून दुसाने यांनी बाजू मांडली होती़ दोन्ही बाजुच्या वकीलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधीश उगले यांनी जामीन अर्जावर  सोमवारी निर्णय देण्याचे सांगितले होते़ 
सोमवारी न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते़ कामकाज होऊन त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित गिरधारी रामराख्या यांच्या जामीन अर्जावर २८ जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सुनावणी होणार आहे़ 

Web Title: Former Minister Hemant Deshmukh rejected the bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.