दोंडाईचा : टाकरखेडा येथील उपसरपंचास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच गावातील चार जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चारही संशयित आरोपी फरार आहेत. दरम्यान, संशयित आरोपीना ताब्यात घेण्यासाठी दोन पथके कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
टाकरखेडा येथील उपसरपंच धीरेंद्रसिंह प्रदीपसिंह सिसोदिया यांनी १० मे रोजी स्वतःच्या राहते घरी वरचा मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात चार संशयित आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील गुन्ह्याचा तपास करीत आहेत. शैलेंद्रसिंह प्रदीपसिंह सिसोदिया यांच्या फिर्यादवरून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी अनिता नरेंद्र गिरासे, नरेंद्र दलपतसिंग गिरासे, बन्सीलाल दलपतसिंगगिरासे, सागर दलपतसिंग गिरासे या चार संशयित आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली असून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे तपासी अधिकारी देविदास पाटील यांनी सांगितले.