दोंदवाडला शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:36 PM2019-10-13T22:36:42+5:302019-10-13T22:37:03+5:30

गावात शोककळा, पोलिसात नोंद

Farmer suicides in Dondwad | दोंदवाडला शेतकºयाची आत्महत्या

दोंदवाडला शेतकºयाची आत्महत्या

Next

धुळे : धुळे तालुक्यातील दोंदवाड येथील भाऊसाहेब भटा माळी (३२) या तरुण शेतकºयाने दुष्काळास तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली़ 
कुटुंबाची आणि शेतीची सर्व जबाबदारी भाऊसाहेब माळी याच्यावर होती़ पावसामुळे पिकांचेही नुकसान झाले होते़ या नैराश्यात असताना शुक्रवारी तो घराबाहेर पडला़ तो घरी न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता़ अशातच त्याच्याच काकांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह रविवारी सकाळी तरंगताना आढळून आला़ त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे़  दोंदवाड गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ 
दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोंदवाड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे़ 

Web Title: Farmer suicides in Dondwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे