धुळे पोलिसांकडून व्हावी कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:20 PM2020-05-23T22:20:00+5:302020-05-23T22:20:28+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोरता आणा

Dhule police should conduct a thorough investigation | धुळे पोलिसांकडून व्हावी कसून तपासणी

धुळे पोलिसांकडून व्हावी कसून तपासणी

googlenewsNext

धुळे : कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ या अनुषंगाने लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे़ घरात बसा विनाकारण फिरु नका असे आवाहन पोलिसांकडून केले जात असताना देखील विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या पुर्वीपेक्षा आता जास्त दिसत आहे़ अशा वाहनधारकांची कसून चौकशी पोलिसांकडून होत आहे़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना त्याचवेळेस विनाकारण फिरणाऱ्यांकडे देखील पाहण्यात येत आहे़ त्यांना रोखण्यासाठी चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़ त्यांच्या मदतीला पोलीस मित्र सुध्दा तैनात करण्यात आले असून माजी सैनिकांची मदत घेण्यात येत आहे़
दरम्यान, चौकात तपासणी करीत असताना वर्दळीच्या रस्त्यावर सुध्दा पोलिसांनी गस्त वाढवावी आणि तिथेच चौकशी करावी अशी मागणी होत आहे़
पोलिसांनी दुचाकी जप्तीची मोहीम राबवित असताना संबंधितांकडून दंड देखील वसूल करायला हवा़ वारंवार सांगूनही दुचाकी घेऊन फिरणाºयांची संख्या रोखण्यासाठी हा उपाय पोलिसांनी करायला हवा़ सध्या त्याची नितांत आवश्यकता आहे़ त्याचा फरक पडू शकतो़
शहराप्रमाणे गाव पातळीवर सुध्दा लक्ष केंद्रीत करायला हवे़ गावात सुध्दा विनाकारण फिरणारे बिनधास्तपणे फिरत आहे़ काही जणांच्या तोंडाला मास्क सुध्दा नसते़ ही बाब गांभिर्याने घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता येऊन ठेपली आहे़

Web Title: Dhule police should conduct a thorough investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे