पाऊस होऊनही कांदे लागवडीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:09 PM2019-09-17T23:09:44+5:302019-09-17T23:10:23+5:30

मालपूर परिसर : मुख्य पीक असूनही पूर्वतयारीच्या काळातील पाणीटंचाईचा विपरित परिणाम

Decrease in cultivation of onions despite rains | पाऊस होऊनही कांदे लागवडीत घट

dhule

Next

मालपूर : यंदा शिंदखेडा तालुक्यात मालपूरसह ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. जोरदार पावसामुळे पुन्हा मूग पीक घेऊन त्या क्षेत्रावर मोठ्या आशेने कांदा लागवड सुरू आहे. तर काही गावाच्या क्षेत्रात या पिकावर कीटकनाशक फवारणी व रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. लागवडीवेळी असलेल्या पाणीटंचाईचा विपरित परिणाम लागवडीवर झाला असून त्यात घट झाली आहे.
मालपूरसह संपूर्ण परिसरात कांदा शेतकºयांचे मुख्य पीक आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात कांद्याची लागवड पूर्वी मोठ्या प्रमाणात होते. यंदा मात्र पावसाळ्यापूर्वीच्या पाणीटंचाईमुळे कांद्याचे लागवड क्षेत्र घटले आहे. २० जुलैनंतर झालेल्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र कांदा लागवडीसाठी खूप आधीपासून नियोजन करावे लागते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यासाठी कांदा रोप टाकावे लागते. त्यानंतर महिना-सव्वा महिन्यानंतर कांदा रोपांची मजुरांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतांमध्ये लागवड करण्यात येते. मात्र यंदा या काळात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने शेतकºयांना रोपे टाकता आली नाहीत. परिणामी कांदा लागवड घटली आहे.
बहुतांश शेतकºयांनी दूर अंतरावरून रोपे आणून कांदा लागवड केली. तर काही शेतकºयांची तयारी नसल्याने त्यांच्याकडून लागवडीचे काम अद्याप सुरू आहे. कांदा पिकाने परिसरातील अनेक शेतकºयांची प्रगती झाली आहे. मात्र बºयाच वेळा बाजारात घेऊन गेलेला माल अत्यल्प दरामुळे तेथेच सोडून शेतकºयांना घरी परतावे लागल्याची अनेक उदाहरणे स्वत: शेतकरी सांगतात. त्यामुळे कांदा लागवड म्हणजे एकप्रकारे जुगार असल्याचे प्रत्ययास येते. गेल्या वर्षी शेतकºयांना या पिकांच्या उत्पन्नात मोठा तोटा झाला होता. मध्यप्रदेश राज्यातील इंदूर व नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील बाजार समित्यांत येथील शेतकºयांनी मातीमोल भावाने कांदा विक्री केली होती. तेव्हा २ ते ६ रूपये प्रतिकिलोने कांदा विक्री झाला होता. शेतकºयांच्या आंदोलनानंतर राज्यात विक्री झालेल्या कांद्यास सरकारकडून अनुदान प्राप्त झाले. मात्र इंदूर तसेच नंदुरबार येथे कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना या अनुदानाचा लाभ न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली.
मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून शेतकºयांनी नव्या उमेदीने व अपेक्षेने कांद्याची लागवड केली आहे. सध्या दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. एवढा जरी भाव मिळाला तरी येथील शेतकरी समाधानी राहतील. परंतु शेतकºयांचा कांदा बाजारात दाखल होतो तोपर्यंत हा भाव टिकून रहावा, अशी आशा शेतकºयांनी व्यक्त केली.
सध्या परिसरात सर्वत्र कांदा लागवडीसह काही शेतकºयांची मशागत, कीडनाशक फवारणी, खते देण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Decrease in cultivation of onions despite rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे