पाडळदेत वीज कोसळल्याने मुलाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:57 PM2019-07-20T18:57:31+5:302019-07-20T18:57:54+5:30

दुर्घटना : दोन मुले जखमी, म्हैस ठार, लोकप्रतिनिधींकडून सांत्वन

Death of the child due to collapse of electricity in Padlade | पाडळदेत वीज कोसळल्याने मुलाचा जागीच मृत्यू

पाडळदेत वीज कोसळल्याने मुलाचा जागीच मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वीज कोसळून एका ११ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर त्याचे दोन चुलत भाऊ जखमी झाल्याची घटना धुळे तालुक्यातील पाडळदे शिवारात शनिवारी दुपारी घडली़ या दुर्घटनेत एका म्हशीचाही अंत झाला आहे़ 
धुळे तालुक्यातील पाडळदे गावात राहणारा पंकज ज्ञानेश्वर राठोड (११) हा जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीत आहे़ सकाळी ११ वाजता शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे तो हितेश संतोष राठोड (१०) आणि आनंद (लखन) दत्तात्रय राठोड (६) यांच्या सोबत शेतात गेला़ नेहमीप्रमाणे शेतात फिरत असताना अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाली़ पावसापासून बचाव व्हावा यासाठी हे तिघे जण शेतातच असलेल्या निंबाच्या झाडाखाली थांबले होते़ त्याचवेळेस अचानक वीज अंगावर कोसळून पंकज राठोड याचा जागेवरच मृत्यू ओढवला़ तर त्याच्यासोबत असलेले हितेश संतोष राठोड, आनंद (लखन) दत्तात्रय राठोड हे जखमी झाले़ घटना लक्षात येताच या तिघांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून पंकज राठोड याला मृत घोषीत केले़ तर त्याच्या सोबतच्या दोघां मुलांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ या दुर्घटनेत इंद्रजीत मदन राठोड यांच्या म्हशींचा मृत्यू झाला आहे़ 
पदाधिकाºयांची भेट
घटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, अशोक सुडके व गोकूळसिंग राजपूत यांनी मृत व जखमींच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांचे सात्वन केले़ मृत मुलाच्या व जखमींच्या पालकांना तातडीने आर्थिक मदत देण्याची सूचना आमदार कुणाल पाटील यांनी तहसीलदार किशोर कदम यांना दिल्या आहेत़ दरम्यान, धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात वीज प्रतिरोधक यंत्र बसवावेत अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे़ 

Web Title: Death of the child due to collapse of electricity in Padlade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे