कोरोना बाधित कराताहेत रुग्णालयात व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:52 PM2020-06-03T22:52:07+5:302020-06-03T22:52:31+5:30

विषाणूवर मात करण्याचा विश्वास : योगासनांमुळे मिळतेय ऊर्जा व चैतन्य

Corona disrupts exercise in the hospital | कोरोना बाधित कराताहेत रुग्णालयात व्यायाम

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांनी व्यायामावर भर दिला आहे. लक्षणे नसलेल्या रूग्णांकडून दररोज संध्याकाळी व्यायामाचे छोटे - छोटे प्रकार नियमित करून घेत असल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.
कोरोना पॉजीटीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. २७ एप्रिल पासून जिल्हा रूग्णालयात तपासणी सुरू झाली आहे. आतापर्यंत २८ रूग्ण उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी १० रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १८ रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दररोज संध्याकाळी अर्धा तास योगासने तर सकाळी १०० ते २०० मीटर चालण्याचा व्यायाम रूग्ण करीत आहेत. नियमित सुरू असलेल्या व्यायामुळे रूग्णांना सकारात्मक ऊर्जा मिळत असून चैतन्य निर्माण झाले असल्याचे डॉ.विशाल पाटील यांनी सांगितले.
दुरध्वनी संचासाठी दात्यांची गरज
लक्षणे विरहीत असलेले रूग्ण जिल्हा रूग्णालयात दाखल आहेत. दिवसभर एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यांना कंटाळवाणे वाटते. रूग्णांना कंटाळा येऊ नये व मनोरंजन व्हावे यासाठी कोरोना कक्षात दोन दुरध्वनी संच लावण्यात आले आहेत. कोणी दाता मदतीसाठी पुढे आला तर आणखी दोन कक्षात दुरध्वनी संचाची व्यवस्था होऊ शकते. मदत उपलब्ध झाली तर उर्वरीत दोन कक्षातही दुरध्वनी संच लावण्यात येतील असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयासह हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, नर्स आणि सर्व कर्मचारी रुग्णांवर केवळ उपचार करत नसून त्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत़
४रूग्णालयात दाखल बाधीत रूग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत. तसेच त्यांच्या शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण ९५ टक्क्यांवर आहे. कोवीड १९ हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असल्यामुळे रूग्णांना धाप लागेल वा त्रास होईल असे व्यायाम प्रकार न करता झेपेल असाच व्यायाम करून घेतला जात आहे. जिल्हा रूग्णालयात एक पोलीस कर्मचारी व एक एसआरपीएफ चा जवान उपचार घेत आहे. त्यांच्या मदतीने रूग्णांकडून योगासने, प्राणायम केले जात आहेत.

Web Title: Corona disrupts exercise in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे