चितोडच्या मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 09:48 PM2020-01-14T21:48:57+5:302020-01-14T21:49:19+5:30

दरोड्याचा होता गुन्हा : समांतर सुरु होता तपास

Chitto's mobile thief arrested by local crime branch | चितोडच्या मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले

चितोडच्या मोबाईल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले

Next

धुळे : दरोडा प्रकरणातील संशयिताला चितोड रोडवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सोमवारी जेरबंद केले़ त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, त्याच्याकडून जिल्ह्यातील बºयेच गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरु होता़ अशातच धुळे तालुक्यातील चितोड येथील भिमवाडीत राहणारा संशयित आकाश हिलाल मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़ माहिती मिळताच संशयित आकाश मोरे (१९) याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला़ चितोड रोडवर त्याला सोमवारी पथकाने शिताफिने ताब्यात घेतले़ त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने शहरातील बारापत्थर परिसरातून एक व्यक्ती फोनवर बोलत असताना त्याच्याकडून त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याची कबुली दिली आहे़ आकाश याच्याकडून १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल देखील ताब्यात घेण्यात आला आहे़ त्याची चौकशी सुरु असून चौकशीत जिल्ह्यातील बºयेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेला आहे़
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचारी रफिक पठाण, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, कुणाल पानपाटील, उमेश पवार, मयूर पाटील, अशोक पाटील, किशोर पाटील यांनी ही कारवाई केली आहे़

Web Title: Chitto's mobile thief arrested by local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.