ट्रकचा पाठलाग करुन जबरी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:03 PM2019-12-13T22:03:30+5:302019-12-13T22:03:56+5:30

मुंबई-आग्रा महामार्ग : चालकाला मारहाण

Chase the truck and rob it | ट्रकचा पाठलाग करुन जबरी लूट

ट्रकचा पाठलाग करुन जबरी लूट

Next

धुळे : पाठलाग करुन ट्रक अडवत चालक, सहचालकाला मारहाण केल्याची घटना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील सरवड गावाच्या शिवारात बुधवारी रात्री घडली़ यात चालकाकडील ८२० रुपये बळजबरीने हिसकावून घेण्यात आले आहे़ दोघांविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला़ 
मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील ठिकरी आनंदबेडी गावातील आरिफ खान रमजान खान (३७) या चालकाने सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, एमएच १८ बीजी ०४३४ क्रमांकाचा ट्रक सेंधव्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतकडे जात होता़ बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन जणांनी या ट्रकच्या दोन्ही बाजुनी सिनेस्टाईल पाठलाग केला़ कोणीतरी पाठलाग करीत असल्याचे बघून ट्रकचालकाने भरधाव असलेला ट्रक थांबविला़ ट्रक थांबताच पाठलाग करणाºया दोघांनी ट्रकमध्ये घुसून चालक आणि सहचालकाला हाताबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यांच्याकडे असलेले ८२० रुपये बळजबरीने     हिसकावून घेतले़ त्यानंतर शिवीगाळ करुन त्यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला़ 
ट्रक चालक आणि सहचालकाने सोनगीर पोलीस ठाणे गाठले़ घडलेल्या आपबीती पोलिसांसमोर कथन केली़ चालकाने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्याद दिल्याने दोघांविरुध्द भादंवि कलम ३४१, ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ सपोनि प्रकाश पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ 

Web Title: Chase the truck and rob it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.