२४ तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:01 PM2020-06-03T12:01:20+5:302020-06-03T12:07:06+5:30

सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन..

Chance of torrential rain in the district in 24 hours | २४ तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

dhule

Next

धुळे : पुढचे २४ तास विशेषत: संध्याकाळी व रात्रीच्या वेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही, या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये, जुने घर कच्चे घर किंवा घर पडण्याचा धोका असलेल्या नागरिकनी ग्रामसेवक किंवा नगरपालिकेशी संपर्क साधून तात्काळ समाज मंदिरात, शाळेत किंवा इतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. पाळीव प्राण्यांना, गुराढोरांना झाडाखाली किंवा खांबाला बांधू नये त्यांना सुरक्षित ठिकाण उपल्ब्ध करावे, रात्रीच्यावेळी वादळामुळे घरावरील पत्रे पडून किंवा उडून जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे झाडे कोसळण्याची तुटण्याची शक्यता लक्षात घेता सतत सावध असावे, अतिवृष्टीमुळे छोट्यामोठ्या नाल्यांना पयार्याने नदीस पूर येण्याची शक्यता असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नदी लाल रेषा पत्रालगत सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात आला आहे, सर्व अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयीच थांबतील, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी १२ नंतर घराच्या बाहेर पडू नये, बाजारातील गर्दी टाळण्यासाठी दुपारी २ नंतर सर्व दुकाने, शॉपिंग मार्केट बंद ठेवण्याचे आवाहनास प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, झाडाजवळ किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नका, आपली वाहने झाडाखाली लावू नका, स्वत:जवळ पिण्याचे पाणी, औषधे, काडीपेटी, दिवा असे साहित्य जवळ बाळगा, घराजवळ पत्रा किंवा तत्सम टोकदार वस्तू असणार नाही याची दक्षता घ्या, तुटलेल्या काचेच्या खिडक्यांपासून दूर राहा, संकटाच्यावेळी ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी किंवा तहासिलदारांशी संपर्क साधा, वीज पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने मोबाईल टॉर्च व इतर उजेड देणा?्या वस्तू हाताशी ठेवा, पूर आल्यास दुर्घटना घडल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनास कळवा अशी घटना पाहन्यासाठी गर्दी करू नका, एकमेकांना सहकार्य करन माणुसकी व भूतदया दाखवा, नदी, नाले यापासून दूर राहा, घाबरू नका, दक्षता घ्या. अफवा पसरवू नका अफवांवर विश्वास ठेवू नका असे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले़

Web Title: Chance of torrential rain in the district in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे