गावठी हातभट्टीचा दारुअड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:29 PM2019-12-13T22:29:08+5:302019-12-13T22:29:32+5:30

थाळनेर शिवार : एका तरुणाला घेतले ताब्यात

The cavalry wreck havoc | गावठी हातभट्टीचा दारुअड्डा उद्ध्वस्त

गावठी हातभट्टीचा दारुअड्डा उद्ध्वस्त

Next

धुळे : थाळनेर शिवारात तापी नदीच्या किनारी सुरु असलेला गावठी हातभट्टीचा दारुअड्डा पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला़ २७ हजार २७० रुपयांची दारुसाठी नायनाटही करण्यात आला असून एका तरुणाला अटक केली आहे़
शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारात तापी नदीच्या किनारी एकनाथ जमादार यांच्या शेतापासून काही अंतरावर सार्वजनिक जागी झाडाझुडूपांमध्ये गावठी हातभट्टीची दारु गाळली जात असल्याची माहिती थाळनेर पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एऩ ए़ रसाळ, पोलीस कर्मचारी विजय जाधव, प्रकाश मालचे, सिराज खाटीक, सरला जाधव, होमगार्ड मुकेश कोळी, आकाश सूर्यवंशी, अमोल ढिवरे यांच्या पथकाने सापळा रचला़ माहिती मिळालेल्या ठिकाणी शिताफिने जावून छापा टाकण्यात आला़ झाडाझुडूपांमध्ये प्लॅस्टिकचे ड्रम ठेवलेले होते़ एक जण चार दगडांनी मांडलेल्या चुलीजवळ बसलेला होता़ चुलीवर कच्चे रसायनाने भरलेले पत्रटी ड्रम, त्यावर मातीच्या भांड्यामध्ये स्टीलची प्लेट, प्लेटला स्टीलची नळी जोडलेली त्यावर जर्मनी पातेले मांडलेले होते़ मातीच्या भांड्यास दारु गाळण्यासाठी मध्यभागी स्टीलच्या प्लेटला लावलेल्या नळीद्वारे दारु प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये गाळली जात असताना पोलिसांनी छापा टाकला़  
पोलिसांनी सर्व साहित्य मिळून २७ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्याची जागेवरच विल्हेवाटही लावली़ याप्रकरणी संशयित राजेंद्र हरचंद शिरसाठ (३५, रा़ पूरग्रस्त कॉलनी, थाळनेर ता़ शिरपूर) या तरुणाला अटक करण्यात आली़ प्रकाश मालचे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला़ 

Web Title: The cavalry wreck havoc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.