केटीवेअरमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:30 PM2020-08-14T12:30:49+5:302020-08-14T12:32:57+5:30

सकाळी लागला शोध, मृतदेहाचे शवविच्छेदन

The body of a young man drowned in KTware was found | केटीवेअरमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

केटीवेअरमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Next

वडजाई : येथील केटीवेअरमध्ये तरुण बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली होती़ त्याचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरु होता़ शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला़ त्याचे शवविच्छेदन करण्यात आले़
धुळे तालुक्यातील वडजाई शिवारात केटीवेअर बंधाऱ्याजवळ दोघे मित्र फिरण्यासाठी आले होते. केटीवेअरला पाणी असल्यामुळे पोहण्यासाठी गेलेला हुसेन फिरदोस अन्सारी (२४) राहणार मच्छीबाजार धुळे हा तरुण बुडाल्याची भीती व्यथा केली जात होती़ या तरुणाचे कपडे, मोबाईल, चप्पल त्या ठिकाणी मिळुन आले होते़ दोघे मित्रापैकी एक तरुण मात्र खुप घाबरलेला असुन तो बोलण्याच्या मनस्थिती नव्हता़
त्या तरुणाचा शोध शुक्रवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आला असता तो मिळून आला़ त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ त्याचे शवविच्छेदन करण्यात आले़ याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे़

Web Title: The body of a young man drowned in KTware was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे