पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:38 AM2021-05-06T04:38:29+5:302021-05-06T04:38:29+5:30

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू आहे. ठिकठिकाणी भाजपा ...

BJP protests violence in West Bengal | पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपतर्फे निषेध

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपतर्फे निषेध

Next

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्याकर्त्यांचे खून झाले आहेत. त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, दुकानांना आग लावणे व व्यवसायाच्या ठिकाणाला आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या असून, आम्ही याचा तीव्र निषेध करतो. निवेदन देतेवेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या समवेत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी यशवंत येवलेकर, चंद्रकांत गुजराथी, हर्षकुमार रेलन, शशी मोगलाईकर, ओम खंडेलवाल, अनिल थोरात, संजय पाटील, देवेंद्र पाटील, आशुतोष पाटील, किशोर सिंघवी, भाऊसाहेब देसले, विनोद थोरात, पुष्कर राठोड, मनोज शिरोडे, सागर कोळगीर, बबन चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, धुळे महानगरतर्फेही भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीतर्फेही पश्चिम बंगालमधील घटनेचा निषेध करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या हत्या बंद कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दक्षिण भारतीय आघाडीचे सहसंयोजक मनोज राघवन, सुरेश नायर, हरी इजवा उपस्थित होते.

जयहिंद चौकातही निदर्शने

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर सुडाचे राजकारण करणाऱ्या, ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करून खून करणाऱ्या तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्या ममता सरकारचा धुळे शहरातील जयहिंद चौकात आंदोलन करून निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपा नगरसेविका प्रतिभा चौधरी, संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर, जिल्हा सरचिटणीस ओमभैया खंडेलवाल, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सागर चौधरी, वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ. योगेश पाटील, सुरेश बागुल उपस्थित होते.

Web Title: BJP protests violence in West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.