३० मिनिटांत १३ विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:01 PM2019-09-18T23:01:49+5:302019-09-18T23:02:13+5:30

मनपा स्थायी सभा : आचारसंहितेपूर्वीची ‘लगीनघाई’; वादग्रस्त विषयालाही मान्यता

Approve 3 topics in 5 minutes | ३० मिनिटांत १३ विषयांना मंजुरी

dhule

googlenewsNext

धुळे : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी लगबग वाढली आहे़ बुधवारी दुपारी घेण्यात आलेल्या स्थायी समिती बैठकीत अवघ्या ३० मिनिटांच्या बैठकीत तब्बल १३ विषयांना मंजुरी देण्यात आली़
मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बुधवारी ३ वाजता स्थायी समितीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती़ यावेळी आयुक्त अजिज शेख, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, नगरसचिव मनोज वाघ आदींसह विभाग प्रमुख व सदस्य उपस्थित होते़ स्थायीची पहिल्या सभेत एकून १२ विषय सभेत मंजूरीसाठी घेण्यात आले होते़ मनपा बांधकाम विभागाकडून होत असलेल्या विकास कामासाठी १ आॅक्टोबर २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१९ अखेर झालेल्या विकास कामांची कार्यादेशाची स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली होती़
याविषयांना मिळाली मंजूरी
मनपा मालमत्ता कराची थकबाकी खटलाबाबत राष्ट्रीय लोकअदालत आयोजनासाठी ४३ हजार ३० रूपये खर्चाला मंजूरी, प्रभाग १८ मधील रमाई नगर भागातील यशवंत नगर घरकूल सार्वजनिक शौचालयापासून ते उत्कर्ष कॉलनी प्रशांत तिवारी यांच्या घरासमोर नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निविदा दरार मंजूरी, जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून राष्ट्रवादी भवन ते स्टेशनरोड पर्यत रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा दर मागविण्यासाठी मंजूरी, जुन्या मनपा इमारतीच्या मागे (खाऊगल्ली) हॉकर्स झोन विकसीक करण्यासाठी मंजूरी, प्रभाग १५ मध्ये वैभव नगर भागात राणा चक्की ते इलेक्ट्रिक डी़पी़ते सैय्यद ते अभय पाटील यांच्या घरापर्यत रस्ता कॉक्रीटीकरण, प्रभाग ८ ग़ नं. २ जे़ बी़ रोड स्वामी नारायण चाळ ते गोल बिल्डींगपर्यत कॉक्रीट गटारीसाठी निविदा दर, प्रभाग १४ मध्ये राजवाडे नगरातील रस्ता कॉक्रीटकरण, प्रभाग १४ रस्ता डांबरीकरण, स्वच्छता देखरेख प्रणाली कार्यान्वीत करण्यासाठी निविदा, तसेच मोराणे गावात पाईप लाईन व व्हॉल टाकण्यासाठी २ लाख ९६ हजार ६५३ कार्यात्तर मंजूरी अशा १२ विषयांना मंजूरी देण्यात आली़
प्रभागात फवारणी मागणी
प्रभागात डांसाची उत्पत्ती वाढल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे़ मलेरिया विभागाकडून अद्याप फवारणी करण्यात आले नाही़ एकच अधिकाऱ्यांवर संपूर्ण शहराची जबाबदारी दिल्यास संपूर्ण प्रभागात धुरळणी करण्यासाठी १२ महिने लागेल़ अधिक कर्मचारी नियुक्त करावी अशी करण्यात आली़

Web Title: Approve 3 topics in 5 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे