भुयारी रस्त्यास कालव्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 09:52 PM2019-09-11T21:52:22+5:302019-09-11T21:53:19+5:30

ेग्रामस्थांचे अतोनात हाल : महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून समस्या अद्याप कायम

The appearance of a canal on a subway | भुयारी रस्त्यास कालव्याचे स्वरुप

dhule

googlenewsNext

सोनगीर : मुंबई - आग्रा महामार्गााचे चौपदरीकरण झाले त्यावेळी येथील बसथांबा परिसरात व बालाजी नगर जवळ नागरिकांसाठी भुयारी मार्ग बनविण्यात आले. मात्र सुरवातीपासून प्रत्येक पावसाळ्यात या दोन्ही मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना समोर जावे लागत आहे.
चौपदरीकर महामार्ग सुरू झाला तेव्हा पासून प्रत्येक पावसाळ्यात नागरिक अडचण सहन करीत आहे. यासाठी अधून मधून आंदोलन, उपोषण केली, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र यावर फक्त तात्पुरता कामे झालीत. मात्र दरवर्षी पावसाळा आला की समस्या कायम असते. यामुळे या समस्येने नागरिक हैराण होत असतात.
येथील गावाच्या पूर्व भागात राहत असलेल्या नागरिक व शेतकऱ्यांसाठी भुयारी मार्ग बनविण्यात आले. यासाठी बालाजी नगरजवळ असलेल्या मार्गासाठी तर बालाजी नगर, लक्ष्मीनगर पार्वती नगरच्या राहवश्यांनी मार्ग तयार करण्यासाठी मोठा संघर्ष केला. मात्र सध्या या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती धुळे - शिरपूर बसथांबा परिसरात असलेल्या भुयारी मार्गाची आहे. या ठिकाणी देखील मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. या मुळे प्रवाशी व नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असतो. दरम्यान दोन्ही भुयारी मार्गामध्ये पाणी साचत असल्यामुळे पाण्यातून जीव मुठीत ठेऊन मार्ग काढावा लागतो.
या संदर्भात वेळोवेळी कंपनीच्या अधिकाºयांना ही अडचण लक्षात आणुन दिली जाते. मात्र या ठिकाणी तात्पुरते काम करून वेळ काढुन नेली जाते. यासाठी मार्गात पाणी सचणारच नाही असे काही ठोस काम केले जावे, अशी मागणी नागरिक करू लागलेत.

Web Title: The appearance of a canal on a subway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे