तिसऱ्या दिवशी झाल्यात १ हजार ३२४ कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:28 AM2020-11-21T11:28:17+5:302020-11-21T11:28:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेण्यासाठी शिक्षकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी देखील जिल्हा रुग्णालयात ...

1 thousand 324 corona tests were done on the third day | तिसऱ्या दिवशी झाल्यात १ हजार ३२४ कोरोना चाचण्या

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेण्यासाठी शिक्षकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी देखील जिल्हा रुग्णालयात शिक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. १ हजार ३२४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत कोरोनाची चाचणी केलेल्या सर्व शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
२३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. त्या पार्श्ववभूमीवर सर्व शिक्षकांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. १७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत कोरोना चाचणी करण्याचे निर्देश शासनाने शिक्षकांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी संजय यादव व मुख्य कार्यकारी अधिकारी वानमथी सी यांनी देखील ताशा सूचना केल्या आहेत. आता तपासणी करून घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असल्याने शिक्षकांची गर्दी वाढली आहे.
गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. सोशल डिस्टंसीग केवळ नावालाच उरले आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात तपासणी करण्यासाठी आलेले शिक्षक घोळके करून उभे असल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. यामुळे कोरोनाचे प्रादुर्भाव अधिक वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शनिवारी सुद्धा शिक्षकांची कोरोना चाचणी सुरु राहणार असल्याचे समजते. परंतू या सर्व चाचणीत एकही शिक्षक पॉझिटिव्ह निघाला नसल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
परंतू ही चाचणी एकाच ठिकाणी घेत असलो तरी शिक्षकांना टप्याटप्याने बोलवून त्यांची चाचणी केली गेली पाहिजे होती. त्यामुळे याठिकाणी गर्दी उसळली नसती आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीतीही राहिली नसती, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

Web Title: 1 thousand 324 corona tests were done on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.