याबाबत माहिती देताना पार्वती हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपिका सस्ते म्हणाल्या, लग्नानंतर एक वर्ष व त्यापेक्षा जास्त काळ होऊनही संतती न झाल्यास, मासिक पाळीच्या तक्रारीमुळे आलेले वंध्यत्व, गर्भनलिका बंद असणे, गर्भ पिशवीच्या समस्या, पुरुष वंध्यत्व व अशा अनेक कारणांमुळे अपत्यप्राप्ती होत नसलेल्या जोडप्यांना वंध्यत्व निवारण व टेस्ट ट्यूब बेबीतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बोलधने हे आधुनिक उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात येणाऱ्या जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबीच्या विविध प्रक्रिया म्हणजेच आयव्हीएफ, इक्सी, इम्सी, लेझर हॅचिंग आदी आधुनिक उपचार पद्धती कशा प्रकारे सवलतीच्या दरात करता येतील, यावरही डॉ. बोलधने माहिती देतील. याचा गरजू जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सस्ते यांनी केले आहे.
-----------------
बरूरकर यांची नियुक्ती
तुळजापूर : महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब जानराव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा महिला उपाध्यक्षपदी येथील नगर परिषदेतील वरिष्ठ लिपिक प्रफुल्लता बरूरकर- तेलंग यांची नियुक्ती झाली आहे. बैठकीस बसवंत सूर्यवंशी, दिलीप लाड, सुनील लोंढे, मुकुंद रायखेलकर, अशोक वडतिले, सुरेश चव्हाण, विजय बांगर, मारुती पवार आदी उपस्थित होते.