रणजित डिसले यांचा येडशीत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:13+5:302021-01-08T05:46:13+5:30
येडशी : युनेस्को व लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजित ...

रणजित डिसले यांचा येडशीत सत्कार
येडशी : युनेस्को व लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजित डिसले यांचा येथील राजे प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष अमोल कवडे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन नलावडे, हजरत जमादार बाबा वेलफेअर सोसायटीचे सचिव हैदर पटेल, सचिन शिंदे, दत्ता धावारे, आबा पवार, माउली तोडकरी, राजाभाऊ देशमुख, मोहन पवार आदी उपस्थित होते.
(फोटो : संतोष मगर ०७)
सुरतगाव शाळेत विद्यार्थ्यांचे आधार ‘अपडेट’
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव जिल्हा परिषद शाळेत शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र शासनाच्या सरल पोर्टलला अपडेट करण्यात आले. यावेळी संगणक ऑपरेटर स्वप्निल कसबे, केंद्रीय मुख्याध्यापक टी. एस. क्षीरसागर, सहशिक्षिका जे. एच. हब्बु उपस्थित होते. दरम्यान, सुरतगाव केंद्रातील ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड सरल पोर्टलला अपडेट करायचे राहिले असतील त्यांनी सुरतगाव येथे विद्यार्थी उपस्थित करून ते करून घ्यावे, असे आवाहन केंद्रप्रमुख रमाकांत वाघचौरे, विस्ताराधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांनी केले आहे. सुरतगाव नंतर केंद्रातील माळुंब्रा व तामलवाडी या शाळेत पुढील कालावधीत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केंद्रप्रमुख रमाकांत वाघचौरे यांनी सांगितले.
१५ जणांची तपासणी
येणेगूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी घेण्यात आलेल्या रॅपिड अन्टीजन टेस्टमध्ये १५ जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंखे व वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ जळकोटे यांनी दिली. यासाठी प्रयोग शाळा तंत्रज्ञ सुधाकर जाधव, पर्यवेक्षिका अनिता बनसोडे, विजय धामशेट्टी, अनिल स्वामी, महेंद्र गायकवाड यांनी सहकार्य केले.