जुगाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:22+5:302021-01-08T05:46:22+5:30
४०२ कारवाया उस्मानाबाद : वाहन कायद्याचे नियम मोडणाऱ्या चालकांवर पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी कारवाया करण्यात येत आहेत. ६ जानेवारी रोजीही ...

जुगाऱ्यांवर गुन्हा
४०२ कारवाया उस्मानाबाद : वाहन कायद्याचे नियम मोडणाऱ्या चालकांवर पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी कारवाया करण्यात येत आहेत. ६ जानेवारी रोजीही १८ पोलीस ठाणे व उस्मानाबाद शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवून ४०३ चालकांवर कारवाया केल्या. यात संबंधितांकडून ८६ हजार ५०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले.
दारू जप्त
उस्मानाबाद : येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने ६ जानेवारी रोजी तालुक्यातील वरूडा येथे छापा टाकला. यावेळी सुरेश गंगावणे हा त्याच्या राहत्या घराजवळ २४ लिटर गावठी दारूसह मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेवर कारवाई
लोहारा : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने ६ जानेवारी रोजी होळी तांडा येथे छापा टाकला. यावेळी तेथील विमलबाई उत्तम राठोड राहत्या भागात १९ लिटर गावठी दारूसह पथकास आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून तिच्या विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.