रांगोळी स्पर्धेने मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:16+5:302021-01-08T05:46:16+5:30

(फोटो : मनोज डोलारे ०७) उस्मानाबाद : येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती उस्मानाबादच्या वतीने येत्या आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित ...

Central Jijau birth anniversary begins with rangoli competition | रांगोळी स्पर्धेने मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सवास प्रारंभ

रांगोळी स्पर्धेने मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सवास प्रारंभ

(फोटो : मनोज डोलारे ०७)

उस्मानाबाद : येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती उस्मानाबादच्या वतीने येत्या आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याची सुरुवात गुरुवारी रांगोळी स्पर्धेने झाली.

येथील श्रीपतराव भोसले विद्यालयात आयोजित स्पर्धेचे उद्‌घाटन मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा नगरसेविका प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते झाले. सामाजिक सलोखा आणि प्रबोधनावर आधारित या रांगोळी स्पर्धेत शहरातील ३०० स्पर्धकांनी भाग घेतला. यात मुलांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.

यावेळी अध्यक्षा प्रेमाताई पाटील, कार्याध्यक्ष अतुल कावरे, मनोज देशमुख, अभय तांबे, रेहमून्निसा शेख, स्वप्निल पाटील, धनश्री कोळपे, मनोज उंबरे, दिलीप आदटराव, माधुरी गरड, सोनाली पडवळ, अर्चना देशमुख यांचा सत्कार प्राचार्य प्रा. साहेबराव देशमुख यांनी केला. यावेळी डाॅ. सुभाष वाघ, भालचंद्र जाधव, अग्निवेश शिंदे, डाॅ. मंजुळा आदित्य पाटील, पर्यवेक्षक प्रा. तानाजी हाजगुडे, प्रा. नंदकुमार नन्नवरे, नूतनचे मुख्याध्यापक प्रदीप गोरे, प्रा. विवेक कापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेसाठी प्रा. सरोज साळुंके, प्रा. दीपाली बंडगर, प्रा. प्रगती वाघमारे, प्रा. लक्ष्मी भोसले, प्रा. शिवकन्या सुरवसे, प्रा. ज्योती शिंदे, प्रा. कविता वडगणे, प्रा. शुभांगी माने यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन प्रा. प्रीती मेटे, प्रास्ताविक प्रा. सुप्रिया मिरगणे यांनी केले. तर प्रा. अनिता तुंगीकर यांनी आभार मानले.

चौकट......

आज आनंद मेळावा

येणाऱ्या आठवड्यात समितीच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत. यात भोसले हायस्कूल मध्ये ८ जानेवारी रोजी आनंद मेळावा, ९ जानेवारीला काव्यवाचन आणि संगीत खुर्ची, ११ जानेवारी रोजी जिजाऊ चौकात रक्तदान शिबिर, स्वधार मतिमंद मुलींच्या वसतिगृहात फळ वाटप, १२ रोजी सकाळी जिजाऊ पूजन व दुपारी स्त्री रुग्णालय येथे मातांचा साडी-चोळी देवून सत्कार करण्यात येणार आहे. समितीच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार व भव्य शोभा यात्रा फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची परिस्थिती पाहून आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा प्रेमाताई पाटील यांनी दिली.

Web Title: Central Jijau birth anniversary begins with rangoli competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.