किरकोळ कारणावरून युवकाला चाकूने भोसकले; खुनाचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 09:06 PM2021-07-30T21:06:26+5:302021-07-30T21:07:39+5:30

Stabbed to the youth : शुक्रवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास मयत युवकाची आई सुनीता विजय किवंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोन्या नाटकरे याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

The youth was stabbed in Udgir; Filed a murder charge | किरकोळ कारणावरून युवकाला चाकूने भोसकले; खुनाचा गुन्हा दाखल 

किरकोळ कारणावरून युवकाला चाकूने भोसकले; खुनाचा गुन्हा दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देजगदीश विजय किवंडे (१९, रा. गांधीनगर, उदगीर) असे मयत युवकाचे नाव आहे.

उदगीर (जि. लातूर) : किरकोळ कारणावरून शहरातील गांधीनगर भागातील एका युवकावर रेल्वे स्थानकासमोरील महात्मा बसवेश्वर चौकात चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी रात्री ९.४५च्या सुमारास घडली. यातील जखमी युवकावर सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला हलविण्यात आले असता, त्याचा मृत्यू झाला.


जगदीश विजय किवंडे (१९, रा. गांधीनगर, उदगीर) असे मयत युवकाचे नाव आहे. उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, आरोपी सोन्या नाटकरे व मयत जगदीश किवंडे यांच्यात गुरुवारी रात्री ९.४५च्या सुमारास रेल्वे स्थानकासमोरील महात्मा बसवेश्वर चौकात रागाने का बघितले? म्हणून वाद झाला. यावेळी आरोपी नाटकरे याने कमरेचा चाकू काढून जगदीश याच्या पोटात मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यामुळे जगदीशला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला.

शुक्रवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास मयत युवकाची आई सुनीता विजय किवंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोन्या नाटकरे याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ३०२चे कलम वाढविण्यात आले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी सांगितले. या घटनेतील आरोपी फरार झाला आहे.

Web Title: The youth was stabbed in Udgir; Filed a murder charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.