youth body found in Vashi creek | वाशी खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह 
वाशी खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह 

ठळक मुद्देसलमान लतीफ कुरेशी(२०) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्ये मागचे कारण मात्र अद्याप उघड झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

नवी मुंबई - वाशी खाडीपुलाखाली आज संध्याकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह गोवंडी येथील तरुणाचा असून त्याने दोन दिवसांपूर्वी खाडीपुलावरून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्ये मागचे कारण मात्र अद्याप उघड झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

सलमान लतीफ कुरेशी(२०) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गोवंडीचा राहणारा असून दोन दिवसांपूर्वी त्याची मोटरसायकल वाशी खाडी पुलावर सापडली होती. सदर मोटरसायकल वाशी पोलिसांच्या ताब्यात असून त्यावेळी खाडीपूल परिसरात तपास करूनही त्याचा शोध लागला नव्हता. अखेर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास वाशी खाडीकिनारी एक मृतदेह आढळल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन पाहणी केली असता, तो सलमान कुरेशीचा असल्याचे उघड झाले. मात्र त्याने आत्महत्या करण्या मागचे कारण उघड होऊ शकलेले नसून याप्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी सांगितले.  


Web Title: youth body found in Vashi creek
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.