'मामा वाचले पण मामीचा काटा काढला...'; दारुड्या मुलाचा नातेवाईकांना धक्कादायक फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 04:25 PM2020-06-12T16:25:06+5:302020-06-12T16:29:20+5:30

तीक्ष्ण हत्याराने वार करून आईचा खून

'Your aunt was killed ...'; The drunken boy killed his mother and called his relatives | 'मामा वाचले पण मामीचा काटा काढला...'; दारुड्या मुलाचा नातेवाईकांना धक्कादायक फोन

'मामा वाचले पण मामीचा काटा काढला...'; दारुड्या मुलाचा नातेवाईकांना धक्कादायक फोन

Next
ठळक मुद्देघटनेनंतर आरोपीने नातेवाईकांना फोनद्वारे कृत्याची माहिती दिली.

सेलगाव : दारूच्या नशेत एका मुलाने जन्मदात्या आईवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. ही खळबळजनक घटना लालवाडी (ता.बदनापूर जि.जालना) येथे गुरूवारी मध्यरात्री घडली. घटनेनंतर आरोपीने नातेवाईकांना फोनद्वारे कृत्याची माहिती दिली.

अन्साबाई भागचंद बारवाल (६० रा. लालवाडी तहत घाटी सिरसगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील लालवाडी येथील भागचंद दगडू बारवाल हे गुरुवारी रात्री पुतण्याच्या घरची वास्तूशांती असल्याने तिकडे गेले होते. घरी अन्साबाई बारवाल (६०) या एकट्याच होत्या. रात्रीच्या सुमारास त्यांचा मुलगा गोपीचंद बारवाल (३२) हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने जन्मदात्या आईवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अन्साबाई बारवाल यांचा जागीच मृत्यू झाला. आईचा खून केल्यानंतर गोपीचंद बारवाल याने नातेवाईकांना फोन करून स्वत:च माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि शामसुंदर कौठाळे, सपोनि सुदाम भागवत, सपोनि भिमाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी भागचंद बारवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपीचंद भागचंद बारवाल याच्याविरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने नातेवाईकांना फोन करून दिली माहिती
आईचा खून केल्यानंतर गोपीचंद बारवाल याने भागचंद बारवाल यांचा भाचा दुर्गासिंग फुलसिंग गोमलाडू याला फोन केला. ‘तुझ्या मामीचा काटा काढला आहे. मामा तिकडे असल्यामुळे मामाचा काटा काढता आला नाही’, अशी माहिती दिली. त्यानंतर दुर्गासिंग यांनी माहिती देताच भागचंद बारवाल यांनी नातेवाईकांसह घरी जाऊन पाहणी केली असता अन्साबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

 

Web Title: 'Your aunt was killed ...'; The drunken boy killed his mother and called his relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.