येरवड्यात किरकोळ कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, अल्पवयीन बालकासह तीन जण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:50 AM2020-05-26T11:50:16+5:302020-05-26T11:52:57+5:30

पूर्व वैमनस्यासह किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून डोक्यात कुऱ्हाड व दगड घालून तरुणाचा खून

Young man brutally murdered in Yerwada for normal reasons, three arrested including minor | येरवड्यात किरकोळ कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, अल्पवयीन बालकासह तीन जण ताब्यात 

येरवड्यात किरकोळ कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, अल्पवयीन बालकासह तीन जण ताब्यात 

Next

पुणे - पूर्व वैमनस्यासह किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून डोक्यात कुऱ्हाड व दगड घालून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना पंचशील नगर येरवडा याठिकाणी सोमवारी रात्री घडली. या घटनेत प्रतीक हनुमंत वन्नाळे  (वय 28, रा. पंचशील नगर येरवडा) याचा खून झाला असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचशील नगर येरवडा कॉमरझोन समोरील मोकळ्या मैदानात हत्यारे घेऊन भांडणे सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी तात्काळ येरवडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व  कर्मचारी रवाना झाले. घटनास्थळी दोन गटात झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाड व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गंभीर जखमी अवस्थेत प्रतिक याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या घटनेत प्रतीक याचा दुसऱ्या गटातील तिघांनी कुराड व दगडाने डोक्यावर वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. येरवडा पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून यात एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अधिक तपास येरवडा पोलिस करीत आहेत. खुनाचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Young man brutally murdered in Yerwada for normal reasons, three arrested including minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.